AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!

Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी…सरकारवर आता पुन्हा दबाव!

| Updated on: Jun 15, 2026 | 2:57 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात झालेल्या या भेटीत मराठा आरक्षण, गॅझेट नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र वाटप यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात झालेल्या या भेटीत मराठा आरक्षण, गॅझेट नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र वाटप यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, समाजाच्या हिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. राजर्षी शाहू महाराजांनी देशात आरक्षणाची संकल्पना राबवली होती आणि त्यांच्या संस्थानाशी संबंधित गॅझेट नोंदी मराठा समाजासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

जरांगे पाटील यांनी कोल्हापूर गॅझेट स्वीकारण्याची मागणी करत शिंदे समिती आणि उपसमितीने येथील कागदपत्रांचा गांभीर्याने अभ्यास करावा, असे म्हटले. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1 लाख 40 हजार नोंदी सापडल्या असूनही केवळ 30 ते 35 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच, आठ दिवसांच्या आत पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो मराठा समाजबांधवांना या प्रक्रियेचा लाभ मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य करत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Published on: Jun 15, 2026 02:56 PM

Follow Us