मुख्यमंत्री असताना आरक्षण देता आलं असतं, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केलं; शशिकांत पवार यांचा आरोप

मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (shashikant pawar slams sharad pawar over maratha reservation)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:20 PM, 1 Dec 2020

सातारा: मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले असते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप शशिकांत पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे. (shashikant pawar slams sharad pawar over maratha reservation)

शशिकांत पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घेतली होती. त्यावेळी शशिकांत पवार यांनी हा आरोप केला. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्यावेळी त्यांच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं. पण पवारांनी तेव्हा दुर्लक्ष केलं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असा दावा शशिकांत पवार यांनी केला.

पवार मुख्यमंत्री असताना त्यांना मी भेटलो होतो. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली होती. पण त्यांनी काही अडचणी आहेत असं सांगून ते टाळलं. तेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न जैसे थे राहिला. पवारांनी मनावर घेतलं असतं तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता असंही ते म्हणाले. (shashikant pawar slams sharad pawar over maratha reservation)

जमत नसेल तर बाजूला व्हा

तर, खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे. तो राज्यानेच सोडवला पाहिजे. सारखं सारखं केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची गरज नाही. जमत नसेल तर बाजूला व्हा आणि ज्यांना जमतंय त्यांना करू द्या. स्वत:ही काही करायचे नाही आणि दुसऱ्यावर खापर फोडायचे, हे आता सोडून द्या, असा टोला उदयनराजे यांनी शिंदे यांना लगावला.

मराठा समाजाचे आमदार आणि खासदार आहेत, त्यांची मराठा आरक्षणाबाबत नैतिक जबाबदारी आहे, ती पार पाडली पाहिजे. सर्व जातीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वाना जसा न्याय मिळाला त्या पद्धतीने मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणात राजकारण नको. स्वार्थासाठी एकत्र येणाऱ्या लोकांना समाजाने बाजू केलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. (shashikant pawar slams sharad pawar over maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

(shashikant pawar slams sharad pawar over maratha reservation)