शिरीष बोराळकर हेच भाजपचे डमी उमेदवार, भाजप बंडखोर रमेश पोकळेंचे टीकास्त्र

भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार घोटाळेबाज आहेत. पदवीधर त्यांना नाकारतील, अशी टीका रमेश पोकळे यांनी केली

शिरीष बोराळकर हेच भाजपचे डमी उमेदवार, भाजप बंडखोर रमेश पोकळेंचे टीकास्त्र

औरंगाबाद :मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील (Aurangabad graduate constituency election 2020) भाजपचे मुख्य उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) हेच डमी उमेदवार आहेत” अशा शब्दात भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे (Ramesh Pokale) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. रमेश पोकळेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे भाजपसाठी वाट अवघड झाली आहे. (Shirish Boralkar is dummy candidate of BJP says rebelling BJP candidate Ramesh Pokale)

“भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर हेच डमी उमेदवार आहेत. शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांसाठी एकही काम केलेलं नाही. सतीश चव्हाण यांनी पदवीधारांसाठी केलेली फक्त 12 कामं सांगावीत. हे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज उमेदवार आहेत. पदवीधर या उमेदवारांना नाकारतील” असा आरोप रमेश पोकळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने ईश्वर मुंडे यांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण निश्चिंत झाले आहेत. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार आहे.

राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ईश्वर मुंडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर भाजपला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे पारडे झाले जड झाले आहे. तर भाजप बंडखोर रमेश पोकळे हे अजूनही रिंगणात असल्याने भाजपसाठी पदवीधरचा गड आता कठीण वळणावर आहे.

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक अगोदरपासूनच भाजपसाठी अवघड मानली जात होती. त्यामध्ये बंडखोरीची भर पडल्याने यंदा भाजपसाठी मराठवाड्याचा गड काबीज करणे जवळपास अशक्यप्राय बाब मानली जात आहे.

मराठवाडा पदवीधरची आमदारकीची जागा गेल्या दोन निवडणूका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ती खेचून आणण्यासाठी भाजप शक्य ते प्रयत्न करतेय तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी राजकारणातले सगळेच छक्के-पंजे वापरून आपली बाजू भक्कम करतेय. त्यामुळे या लढाईत कोणाचा विजय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भाजपला पाडण्यासाठीच उमेदवारी अर्ज मागे घेतला: जयसिंगराव गायकवाड

भाजपला जास्त मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच, असा निर्धार जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी व्यक्त केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला आहे. (Shirish Boralkar is dummy candidate of BJP says rebelling BJP candidate Ramesh Pokale)

संबंधित बातम्या:

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा

मातब्बर नेत्याने पक्ष सोडला, बंडखोरही अडला; औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड

(Shirish Boralkar is dummy candidate of BJP says rebelling BJP candidate Ramesh Pokale)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI