Shiv Sena: कुठं सरवणकरच्या पोस्टर्सला काळं फासलं तर कुठे लांडेंचे पोस्टर्स फाडले, कुडाळकरविरोधातही शिवसैनिक आक्रमक, बंडखोरांविरोधात राडा

शिवसैनिकांनी कुठे बॅनर फाडलेत तर कुठे बॅनरला काळे फासल्याची घटना घडली आहे. राज्यभरात शिवसैनिकांचा राडा सुरु आहे. शिवसैनिकांनी सदा सरवणकर, दिलीप मामा लांडे आणि मंगेश कुडाळकर यांच्या बॅनरला काळे फासून ते फाडले आहेत. संपूर्ण राज्यात शिवसैनिक आक्रमक होत रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

Shiv Sena: कुठं सरवणकरच्या पोस्टर्सला काळं फासलं तर कुठे लांडेंचे पोस्टर्स फाडले, कुडाळकरविरोधातही शिवसैनिक आक्रमक, बंडखोरांविरोधात राडा
कुठं सरवणकरच्या पोस्टर्सला काळं फासलं तर कुठे लांडेंचे पोस्टर्स फाडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 7:09 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात बंडखोरी केली. शिंदेंना 42 आमदारांनी समर्थन दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांनी शिंदेंना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र अद्याप शिंदे गट मुंबईत आला नाही. शिंदे यांच्यासह 42 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक (Shivsainik) मात्र चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांनी कुठे बॅनर (Banner) फाडलेत तर कुठे बॅनरला काळे फासल्याची घटना घडली आहे. राज्यभरात शिवसैनिकांचा राडा सुरु आहे. शिवसैनिकांनी सदा सरवणकर, दिलीप मामा लांडे आणि मंगेश कुडाळकर यांच्या बॅनरला काळे फासून ते फाडले आहेत. संपूर्ण राज्यात शिवसैनिक आक्रमक होत रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

आमदार सदा सरवणकर यांचा दादरमधील खेड गल्ली शाखेवर असलेल्या बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासले आहे. तसेच सरवणकरांचे बॅनर काढून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेला बॅनर शिवसैनिकांनी शाखेवर लावला आहे. कुर्ल्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी सेना आमदार दिलीम मामा लांडे यांचे बॅनर फाडले. लांडे शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कुर्ला विधान सभा शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले. त्यानंतर चुनाभट्टीतील शाखा क्र 170, 171 तसेच कुर्ला विधान सभेतील सर्व शिवसेना शाखेच्या बाहेर शिवसेनेकडून ‘शिवसेनेचे आमदार गद्दार मंगेश कुडाळकर याचा जाहीर निषेध’ असे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेरील बॅनरही शिवसैनिकांनी फाडले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरातही एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लागलेले पोस्टर उतरवले

कोल्हापुरातही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लागलेले पोस्टर शिवसैनिकांनी उतरवले. अज्ञातांनी मध्यरात्री हे पोस्टर लावले होते. शहराच्या विविध भागात पोस्टर लावले होते. पोस्टर लागल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी अवघ्या काही तासात पोस्टर उतरवले. कालच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर शहरभर लागलेल्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

ठाण्यातील घोडबंदर येथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा शिंदे पुढे घेऊन जात आहेत असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. ‘आम्ही शिंदे साहेब समर्थक’ व सर्व सहकारी आमदारांचे समर्थन करत मजकूर लिहून बॅनरवर सर्व शिवसैनिक नेत्यांचे फोटो वगळून फक्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोन जणांचे फोटो लावण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.