लोकसभेवेळीच आमचा विधानसभेचा फॉर्म्युला ठरलाय : उद्धव ठाकरे

भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी  अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही ठरला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

लोकसभेवेळीच आमचा विधानसभेचा फॉर्म्युला ठरलाय : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 20, 2019 | 3:07 PM

मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला (BJP Shiv Sena formula) आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही (BJP Shiv Sena formula) ठरला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.  शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा फॉर्म्युला ठरला आहे. यावेळी मी वेगळी पद्धत अवलंबली आहे, मुख्यमंत्री उमेदवारांची यादी तयार करून देतील ती आमच्या नेत्यांशी चर्चा करून युती जाहीर होईल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

युतीत कोणताही तणाव नाही. लवकरच युतीची घोषणा होईल,  लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

लोकसभेवेळी कोणता फॉर्म्युला ठरला होता?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

त्यावेळी शिवसेनेची दुसरी अट होती ती म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या यांचंही समान वाटप होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

भाजपचा नवा प्रस्ताव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांची जागावाटपावर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार, शिवसेना 126 तर भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा असा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ठरलेला हा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह 22 तारखेला मुंबईत येणार आहेत. त्यावेळी या जागावाटपांचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

‘वर्षा’वर फॉर्म्युला जवळपास निश्चित, भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा, शिवसेनेला किती?  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.