तुमचा पंतप्रधान, आमचा मुख्यमंत्री, युतीसाठी शिवसेनेची अट

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी आणि युतीसाठी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींचा आहे. मुंबईत आज सगळ्याच पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत. शिवसेनेकडून वरिष्ठांना मातोश्रीवर बोलावणं धाडण्यात आलं आहे, तर शरद पवारांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. तिकडे मनसेची राजगडावर आज पदाधिकाऱ्यांची बैठक …

तुमचा पंतप्रधान, आमचा मुख्यमंत्री, युतीसाठी शिवसेनेची अट

मुंबई: लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी आणि युतीसाठी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींचा आहे. मुंबईत आज सगळ्याच पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत. शिवसेनेकडून वरिष्ठांना मातोश्रीवर बोलावणं धाडण्यात आलं आहे, तर शरद पवारांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. तिकडे मनसेची राजगडावर आज पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकांचं सत्र सुरु असताना शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार का आणि त्या युतीसाठी कोणत्या पक्षाची काय अट आहे, याबाबतच्या चर्चा सर्वाधिक सुरु आहेत.

वाचा: भाजप-शिवसेना युतीसाठी थेट मोहन भागवतांची मध्यस्थी?  

शिवसेनेने आधी स्वबळाची घोषणा केली होती.मात्र भाजपने सातत्याने युतीचा आग्रह धरला. त्यानंतर युतीसाठी दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. पण शिवसेनेने भाजपसमोर युतीसाठी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह कायम ठेवला आहे. देशात भाजपचे पंतप्रधान हवे असतील तर, महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जागावाटपामध्ये शिवसेनेने 1995 चा फॉर्म्युला समोर ठेवला आहे. त्यानुसार शिवसेना 169 आणि भाजप 119 जागांचा हा फॉर्म्युला होता. शिवाय मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हवं आहे.

दरम्यान, युतीसाठी भाजपचे राष्ट्रीय नेते मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरींसारखे नेते युतीसाठी पुढाकार घेऊ शकतात. राष्ट्रीय नेते मातोश्रीवर आले तर त्यांचे स्वागत असेल, असं संजय राऊत म्हणाले. युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, तसा विडाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उचलल्यांचं शिवसेना नेते सांगतात.

संबंधित बातम्या 

भाजप-शिवसेना युतीसाठी थेट मोहन भागवतांची मध्यस्थी?  

शिवसेना-भाजप युतीचं घोडं ‘या’ दोन जागांवर अडलंय!   

शिवसेना-भाजप युती जवळपास निश्चित, ‘या’ एका जागेसाठी सेना अडून बसलीय!  

राऊत म्हणाले, शिवसेनाच मोठा भाऊ, दानवे म्हणतात….

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *