Sanjay Raut : कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांचा पुनरुच्चार

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग.

Sanjay Raut : कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राष्ट्रपती राजवट लागू करा; राऊतांचा पुनरुच्चार
कायद्याचा आणि घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला; राऊतांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
संदीप राजगोळकर

| Edited By: भीमराव गवळी

Jul 17, 2022 | 10:55 AM

नवी दिल्ली: पंधरा दिवस झाले तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग. पण नैतिकता काय आहे? या सरकारला नैतिकता काय आहे? सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे, ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात राज्य नसावं, असं राऊत म्हणाले.

आम्हाला कायदा शिकवू नका

हे सरकार घटनेची पायमल्ली करून स्थापन झाले आहे. म्हणून आतपर्यंत त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. त्यांना कायद्याचा धाक आहे, त्यामुळेच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीयेत. आम्हाला संपूर्ण घटना माहीत आहे आणि या सरकारचे भविष्यात काय होणार हे माहीत आहे, आम्हाला कायदा शिकवू नका, असा पलटवार राऊत यांनी भाजपवर केला.

हे सुद्धा वाचा

शिवसेना यूपीएसोबत

यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दुपारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेनाही उपस्थित राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना यूपीएसोबत राहील असं सांगितलं जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें