भेटीगाठी वाढल्या, आता संजय राऊत शरद पवारांच्या घरी, दोघेही एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींकडे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले.

भेटीगाठी वाढल्या, आता संजय राऊत शरद पवारांच्या घरी, दोघेही एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींकडे
Sharad Pawar_Sanjay Raut
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 5:27 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीची चर्चा सुरुच असताना, तिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरु होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेत्यांची रेलचेल सुरु आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला महत्त्व आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सातत्याने काँग्रेस आक्रमक होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार वेगळं समीकरण जुळवतात का असा तर्क लढवला जात आहे.

शरद पवारांचं मोदींना पत्र

दरम्यान, शरद पवारांनी मोदींच्या भेटीत बँकिंग सुधारणा कायद्याबाबत पत्र लिहिलं आहे. सहकार क्षेत्रांतील बदलामुळे सहकारी बँकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या, सहकारासंबंधी कायद्यांसंबधी बदलांबाबतचे आक्षेप यासंबंधी निवेदन पवारांनी मोदींना दिलं आहे.

सहकार आणि बँकिंग कायद्यातील सुधारणांचं स्वागत आहे. पण अधिनियमातील मूलभूत तरतुदींमध्ये काही विसंगती आहेत. जे विशेषत: 97 व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकारी तत्त्वांमध्ये आढळतात. सुधारित कायद्याची उद्दीष्टे चांगल्या हेतूने आहेत. त्यातील बर्‍याच तरतुदी आवश्यक आहेत. बोर्ड आणि व्यवस्थापन निश्चितपणे कठोरपणे कारवाई केली पाहिजे आणि ठेवीदारांचे हित संरक्षित केले पाहिजे. परंतु त्याच वेळी हे सुनिश्चित केले पाहिजे की असे करताना घटनेत नमूद केलेल्या सहकारी तत्त्वांचा बळी दिला जाऊ नये, असं शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

VIDEO : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला 

संबंधित बातम्या 

सुधारित सहकार कायद्यात विसंगती, अतिउत्साहात तत्वांचा बळी नको, पवारांचं मोदींना भलंमोठं पत्र

उद्धव-मोदींच्या भेटीनं महाराष्ट्रातलं सरकार ‘अस्थिर’ झालं, आता पवार-मोदींच्या भेटीनं काय होईल?; वाचा सविस्तर

(Shiv Sena MP Sanjay Raut met NCP chief Sharad Pawar after Narendra Modi Sharad Pawar meet)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.