‘…तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन’, उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"तेलंगणाचा आणि माझा काय संबंध आहे? मला कदाचित असं वाटतंय की, ही सगळी मोठी माणसं आहेत. मोदी वगैरे फार मोठी माणसं आहेत. त्यांना कुणीतरी मेसेज लिहून देणारा असतो, असं वाटतं. परत टेलिप्रॉम्पटर असतं. टेलिप्रॉम्पटर कुठे ठेवला असेल किंवा नसेल म्हणून ते काहीतरी बोलले असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'...तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन', उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 6:27 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 नेटवर्कला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आलं तर सर्वात आधी आपण धावून जावू, असं मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपणही मोदींवर संकट उद्भवल्यास सर्वात आधी धावून जाऊ, असं वक्तव्य केलं.

“हे मला दाखवण्यापेक्षा तुम्ही त्यांना परत का दाखवत नाहीत? ते त्यांनाच दाखवा परत. कारण आता ते मला नकली संतान म्हणत आहेत. तेच झालंय ना… म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतोय. 2014 ला काय म्हणाले होते ते त्यांना आठवत नाही. 2019 ला काय म्हणाले होते ते त्यांना आठवत नाही. त्यानंतर 2024 ला काल काय बोलले ते आज आठवत नाही. आज काय बोलले ते उद्या आठवत नाही. मी याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? हा व्हिडीओच त्यांना परत दाखवाना”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मोदी वगैरे मोठी माणसं, त्यांना मेसेज लिहून देणारा…’

“बरं! कुठे भाषण करतोय त्याचं त्यांना भान नाही. तेलंगणात जाऊन मला नकली संतान म्हणत आहेत. तेलंगणाचा आणि माझा काय संबंध आहे? मला कदाचित असं वाटतंय की, ही सगळी मोठी माणसं आहेत. मोदी वगैरे फार मोठी माणसं आहेत. त्यांना कुणीतरी मेसेज लिहून देणारा असतो, असं वाटतं. परत टेलिप्रॉम्पटर असतं. टेलिप्रॉम्पटर कुठे ठेवला असेल किंवा नसेल म्हणून ते काहीतरी बोलले असतील. पण त्यांचं भाषण लिहिणाऱ्याला बहुतेक आता मानधन न मिळाल्यामुळे संपावर गेला असावा”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

नरेंद्र मोदी दोन-तीन गोष्ट बोललेले आहेत, जर काही झालं तर उद्धव ठाकरेंच्या मदतीला सर्वात आधी मी धावून जाईल, असं मोदी म्हणाले. त्यावर काय सांगाल? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं. “मोदींनाही काही झालं तर मी धावून जाईन. त्यामध्ये काय, ही माणुसकी आहे. हेच तर आमचं हिंदुत्व आहे. ज्यावेळेला आमचा शिवसैनिक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पूर आला तर हे पूरग्रस्त मुसलमान आहेत, असं बघत नाहीत. ते स्वत:च्या जीवावर उधार होऊन नागरिकांना वाचवतात. यालाच माणुसकी म्हणतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे बाळासाहेबांचे विचार आहेत? ठाकरेंचा सवाल

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मोदींना किती माहिती आहे? महाराष्ट्र ज्याप्रकारे लुटत आहेत, मुंबईतील हिरे व्यापार ते गुजरातला घेऊन गेले. मुंबईतील आर्थिक केंद्र हे मी मुद्दामून सांगेन जे काँग्रेस सरकारने दिलं होतं, तिथे त्यांनी बुलेट ट्रेन आणल्या. हे बाळासाहेबांचे विचार आहेत? मुंबई आणि महाराष्ट्र कराच्या रुपयात एक रुपया केंद्राला देतो तेव्हा केंद्राकडून फक्त आठ आणे मिळतात. हे बाळासाहेबांचे विचार आहेत?”, असा सवाल ठाकरेंनी केला.

“आरेची कारशेडबद्दल मी बोलत होती की कांजुरमार्गला एक स्वतंत्र टर्मिनस होऊ शकतं. आरेच्या कारशेडमुळे पर्यावरणाची हानी केलेली आहे. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? मुंबईच्या एफडी तोडल्या. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. मुंबईचं वैभव लुटत आहेत. मराठी माणसाला आमच्याकडे जागा नाही अशा तुमच्या गुजरातच्या कंपनी इकडे जाहिरात करत आहेत. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का?”, असेदेखील प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.

बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना एकनाथ शिंदेंची?

मोदींचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. त्यावर काय म्हणाल? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मोदींना बाळासाहेबांचे विचारच कळलेले नाहीत. त्यांना बाळासाहेबांचा हिंदुत्वच कळलेलं नाही. बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेला इथे राहून जे पाकिस्तानचे स्वप्न बघत आहेत त्यांना विरोध केलेला आहे”, असं ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.