Sri Lanka crisis : उपाशी जनता सिंहासन खाते! श्रीलंकेत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून ‘सामना’चा मोदींना टोला

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर (BJP) निशाणा साधण्यात आला आहे. श्रीलंकेत जी परिस्थिती निर्माण झाली त्याचे चितंन करणे गरजेचे असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.

Sri Lanka crisis : उपाशी जनता सिंहासन खाते! श्रीलंकेत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून 'सामना'चा मोदींना टोला
संजय राऊत Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:28 AM

मुंबई : आज पुन्हा एकदा सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्र सरकारवर (central government) निशाणा साधण्यात आला आहे. जपाण आणि श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) सध्या सुरू असलेल्या घडामोडींचे उदाहरण देत सामानामधून भाजपाला टोला लगावण्यात आला आहे. उपाशी जनता सिंहासन खाते! असं सामनाच्या आजच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका जाहीर सभेत हत्या करण्यात आली. आबे हे हिंदुस्थानचे मित्र होते. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचा खास दोस्ताना होता. आबे हे अहमदाबादेतही जाऊन आले होते. भारताच्या अर्थव्यस्थेत सध्या जी थोडीफार उलाढाल सुरू आहे, त्यात शिंजो आबे यांचे योगदान आहे. जपानच्या मदतीने आपल्याकडे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मात्र एका माथेफिरूने आबे यांना भरसभेत गोळी घातली. त्यामगची कारणे बाहेर येतील. आबे रक्ताच्या थारोळ्यात पडले असतानाच आपल्या बाजूच्या श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे. श्रीलंकेत आर्थिक संकट सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी अशा गर्तेत देश सापडला आहे. राज्यकर्त्यांनी मारलेल्या भूलथापांमुळे आधी लोकांनी पंतप्रधान राजपक्षे यांना पळून लावले. असं म्हणत सामनामधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.

चिंतनाची गरज

सामनामध्ये पुढे म्हटले आहे की, आधी पंतप्रधान राजपक्षे पळाले, त्यानंतर आता पुन्हा एकदा जनता रस्त्यावर उतरली आहे. लोक हिंसक झाले. त्यामुळे राष्ट्रपती गोटाबाया यांना देश सोडून पळून जावे लागले. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. एकप्रकारे श्रीलंकेत अराजक माजले आहे. हिंसाचार, जाळपोळीचा कहर सुरू आहे. पोलीस व जनतेत रस्त्यारस्त्यांवर धुमश्चक्री सुरू आहे, व सोन्याची लंका उद्ध्वस्त होताना दिसत आहे. रामायणात हनुमानाच्या शेपटीने लंका जाळली आता राज्यकर्त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीने लंका जळत आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या का झाली? श्रीलंकेत उठाव का झाला? व तेथील सत्ताधीशांना सिंहासन सोडून पळ का काढावा लागला याचे चिंतन आपल्या देशात होणे गरजेचे असल्याचे सामनामधून म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

रोम जळत होते नीरो फिडल वाजवत होता

रोम जळत होते, तेव्हा नीरो मस्तमौला होऊन फिडल वाजवत होता. तशीच स्थिती आता श्रीलंकेत निर्माण झाली आहे. लोकांच्या संयमाचा बांध तुटला व सुरक्षा दल, बंदुकांची पर्वा न करता जनता रस्त्यावर आली. आर्थिक संकट इतके गंभीर आहे की, लंकेत विजेअभवी अंधार आहे. लोकांना पेट्रोल, डिझेल, रॉकेल, धान्य मिळत नाही. राज्यकर्ते फक्त अश्वासनावर अश्वासने देत राहिले. त्या अश्वासनात दम नाही हे लक्षात येताच तेथील जनतेने उठाव केल्याचे म्हणत सामनातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.