AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : चर्चा बबनदादांच्या भाजपातील प्रवेशाची, विरोधक शिंदे गटात, माढ्याच्या राजकारणाला वेगळे वळण

आमदार, खासदार यांनी तर शिंदे गटात प्रवेश केला आहेच पण आता स्थानिक पातळीवरील पदाधिकारीही हा गट जवळ करीत आहेत. माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे संजय कोकाटे आणि मोहोळची नागनाथ शिरसागर तसेच त्यांचे चिरंजीव सोमेश शिरसागर हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत.

Solapur : चर्चा बबनदादांच्या भाजपातील प्रवेशाची, विरोधक शिंदे गटात, माढ्याच्या राजकारणाला वेगळे वळण
माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 29, 2022 | 10:27 AM
Share

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून (Madha) माढा विधानसभा मतदार संघाचे (Babandada Shinde) आमदार बबनदादा शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा ही दबक्या आवाजात होती. मात्र, दिल्लीवारीत त्यांनी आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची चर्चा उघड होऊ लागली. हे सर्व घडत असताना बबनदादा शिंदे यांचे विरोधक संजय कोकाटे यांनी थेट (Eknath Shinde) शिंदे गटात प्रवेशही केला आहे. त्यामुळे बबनदादांच्या प्रवेशाची केवळ चर्चा होत राहिली आणि तिकडे कोकाटे यांनी आ. शहाजी बापू पाटील यांच्या सोबत जाऊन शिंदे गटात प्रवेशही केला. त्यामुळे माढ्याच्या राजकारणात मोठा क्लायमॅक्स आला आहे. एवढेच नाहीतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार राहिलेले कोकाटे यांनीही शिवसेना नेतृत्वावर सवाल उपस्थित करीत हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. मात्र, संजय कोकाटे यांच्या निर्णयानंतर आता बबनदादा शिंदे काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

माढा, मोहोळ येथील शिवसैनिक शिंदे गटात

आमदार, खासदार यांनी तर शिंदे गटात प्रवेश केला आहेच पण आता स्थानिक पातळीवरील पदाधिकारीही हा गट जवळ करीत आहेत. माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे संजय कोकाटे आणि मोहोळची नागनाथ शिरसागर तसेच त्यांचे चिरंजीव सोमेश शिरसागर हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत. मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पाठिंबाचे पत्र त्यांना दिले. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे स्थानिक राजकारणावरही याचा परिणाम होणार आहे.

बबनदादांच्या भेटीनंतर हालचालींना वेग

राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान, माढा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी हे दोघे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगून लागल्या होत्या. पण यावर आपण काही बोलणार नसल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले होते. त्यांचा निर्णय होणार की नाही हे गुलदस्त्यात असतानाच शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी मात्र शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोबत मोहोळ येथील शिवसैनिकांना घेऊन त्यांनी हा प्रवेश केल्याने आता राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

नेतृत्वावर सवाल उपस्थित करीत कोकाटेंचा निर्णय

गेल्या दीड वर्षापासून आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, आपल्याला भेट देण्यात आली नाही. माढ्याच्या विकासकामासाठी निधीची मागणी करण्यासाठी भेट गरजेची होती. पण दीड वर्षात आपण पक्ष प्रमुखांपर्यंत पोहचू शकलो नाही. आ. बबनदादा शिंदे यांच्या विरोधात 76 हजार मते घेऊनही भेट दिली जात नाहीतर मग मतदार संघातील विकासकामे कशी होणार? म्हणून आपण शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?