शिरुरमधून लढून दाखवा, आढळराव पाटलांचं अजित पवारांना आव्हान

पुणे/नवी दिल्ली : शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो तर नक्कीच निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बोलून दाखवला. या मतदारसंघातले शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी अजित पवारांना आता खुलं आव्हान दिलंय. हिंमत असेल तर निवडणूक लढा, असं आव्हान आढळराव पाटलांनी दिलंय. शिरूर येथील एका शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी …

शिरुरमधून लढून दाखवा, आढळराव पाटलांचं अजित पवारांना आव्हान

पुणे/नवी दिल्ली : शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो तर नक्कीच निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बोलून दाखवला. या मतदारसंघातले शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी अजित पवारांना आता खुलं आव्हान दिलंय. हिंमत असेल तर निवडणूक लढा, असं आव्हान आढळराव पाटलांनी दिलंय.

शिरूर येथील एका शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी विश्वास बोलून दाखवला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसेल तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं शरद पवार साहेबांना सांगितलं आहे. मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा फॉर्म भरला तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवीन, अन्यथा पवाराची औलाद सांगणार नाही, असं अजित पवार म्हणाले होते. वाचा – शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?

अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर गप्प राहतील ते आढळराव पाटील कसले. आढळराव पाटलांनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं आणि त्यांना प्रतिआव्हान देत निवडणूक लढा म्हणून सांगितलंय. अजित पवारांचा हे वक्तव्य करण्यामागचा हेतू निश्चित नसला तरी शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल चर्चा रंगणार हे नक्की आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती काय?

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील आहेत. शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेना भाजप पक्षाच्या युतीतून निवडून आलेले खासदार आहेत. 2004 साली खेड लोकसभेचे खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील हे पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2009 साली नव्याने स्थापन झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार आणि त्यांच्या कारकीर्दीतले दुसरे खासदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला विजय मिळवत सलग तीन वेळा खासदार होऊन हॅट्ट्रिक केली. वाचामराठा मतांसाठी राष्ट्रवादीची ‘व्यूहरचना’

2014 साली शिरूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम आणि शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात. या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना 6 लाख 43 हजार 415 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांना 3 लाख 41 हजार 601 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल 301814 मतांनी दारून पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *