शिवसेना-भाजप युतीचं घोडं ‘या’ दोन जागांवर अडलंय!

मुंबई : शिवसेनेचा स्वबळाचा नारा नरमला असून, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चाही सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी . शिवसेना-भाजप युतीचा 23-25 चा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र, भिवंडी आणि पालघर हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने मागितल्याने युतीचं घोडं अडलं आहे. त्यामुळे युतीची चर्चा होत असताना, फॉर्म्युल्यावर एकमत होत असलं, तरी चर्चा मतदारसंघांची आल्यावर […]

शिवसेना-भाजप युतीचं घोडं 'या' दोन जागांवर अडलंय!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : शिवसेनेचा स्वबळाचा नारा नरमला असून, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चाही सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी . शिवसेना-भाजप युतीचा 23-25 चा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र, भिवंडी आणि पालघर हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने मागितल्याने युतीचं घोडं अडलं आहे. त्यामुळे युतीची चर्चा होत असताना, फॉर्म्युल्यावर एकमत होत असलं, तरी चर्चा मतदारसंघांची आल्यावर चर्चा थांबते. कारण शिवसेना भिवंडी आणि पालघरच्या जागांची मागणी लावून धरत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2014 साली काय झालं होतं?

भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो मागील 30 वर्षांपासून अनुसूचित जमातीसाठी राखीव डहाणू लोकसभेचा भाग होता. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा नव्याने खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ निर्माण झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांनी इथून दणदणीत विजय मिळवला.

शहरीकरण झालेल्या कल्याण, भिवंडी या क्षेत्रासह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यासह वाड्याकडील ग्रामीण भाग येत असल्याने येथील आगरी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून भाजपाने खेचून घेतला. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात दाखल झालेले कुणबी सेनेचे संस्थापक विश्वनाथ पाटील यांचा तब्बल 109450 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. तर मनसेचे सुरेश म्हात्रे हे 93647 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

पालघर लोकसभा मतदारसंघात 2014 साली काय झालं होतं?

मोदी लाटेत 2014 ला पालघर मतदारसंघात भाजपचे दिवंगत नेते चिंतामण वनगा हे 2 लाख 39 हजार 520 मतांनी जिंकून आले होते. या निवडणुकीत त्यांना 5 लाख 33 हजार 201 मते मिळाली. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 681 मते मिळाली होती. या निवडणुकीत बळीराम जाधव यांचा पराभव झाला होता. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याने काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता.

2018 मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर खासदारकीच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. यामध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी शिवेसेनेचे उमेदवार आणि दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना पराजित करून पोटनिवडणूक जिंकली.

दरम्यान, शिवसेना नरमाईची भूमिका घेते की, भाजप मनाचा मोठेपणा दाखवते, हे येत्या काळात कळेलच. मात्र, स्वबळाचा नारा देत महाराष्ट्रभर भाजपविरोधात आवई ठोकणाऱ्या शिवसेना नरमल्याचे मात्र समोर आले आहे. जागावाटपावर चर्चा सुरु करुन, शिवसेनेने आपले विरोधाचे शस्त्र म्यान केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.