मित्राकडून धोका, मात्र 30 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे

ज्यांच्याशी 30 वर्ष सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात." अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticises bjp)  केली.

मित्राकडून धोका, मात्र 30 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे

मुंबई : “30 वर्ष आम्ही ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्या मित्रांनी विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी 30 वर्ष सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात.” अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticises bjp)  केली.

देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. नुकतंच या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांच्या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून नाव देण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

“मी सर्वांना धन्यवाद देताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही धन्यवाद द्यायचं आहे. कारण तीन टोकाचे तीन लोक एकत्र येत आहोत. पण एक वेगळी दिशा देशाला देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत.” असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray criticises bjp) म्हणाले.

“मी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ऐकली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नाही. शिवसेनेने सोनिया गांधीची लाचारी पत्करली अशा अनेक टीका केल्या. पण मी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो. त्यांच्यावर बोलण्यासाठी कोणत्याही मैदानात कोणत्याही ठिकाणी मी बोलायला तयार आहे. मी घाबरणारा नाही. तर लढणारा नेता आहे. खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाही.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही कधीही मातोश्रीबाहेर पडलो नाही असेही ते बोलले. मी त्याचं उत्तर देईन. पण जे मातोश्रीवर आले आणि बाहेर जाऊन खोटं बोलतात. त्यांची साथ मी कदापी देणार नाही. असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray criticises bjp) म्हणाले

“ज्या वेळेला मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी विचारले जाते की संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? मला संघर्षात नाही पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर मला बाळासाहेबांची आठवण येते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब म्हणायचे, उद्धव विचार करुन दे. एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द पाडायचा नाही अशी आठवणी उद्धव ठाकरेंनी यावेळी (Uddhav Thackeray criticises bjp)  सांगितली.

“हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत, एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील,” असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray criticises bjp) म्हणाले.

“माझं सरकार म्हणजे आपल्या सर्वांचे सरकार हे कुणाशीही सुडाने वागणार नाही. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खूप खिळे असतात, जाणारे मुख्यमंत्री खिळे ठोकून जातात, पण तुम्ही सोबत असाल तर ते खिळे मी हातोड्याने ठोकेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याला नवी दिशा देणारी ही आघाडी आहे. महाविकासआघाडी ही राज्याच्या हितासाठी असणार आहे. शेतकरी शेतमजूरांसाठी ही महाविकासआघाडी असेल. असे यावेळी शिवसेना नेत्यांनी बोलताना सांगितले.  महाराष्ट्र विकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांसह विविध नेते मंडळी उपस्थित (Maharashtra Vikas aghadi press conference) होते.

तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. येत्या 1 डिसेंबरला महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होईल. यासाठी महापालिकेला तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *