AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती नटी कुठे आहे?; हाथरसच्या घटनेवरून राऊतांनी कंगनाला डिवचले

हाथरसप्रकरणी कंगना रानौतचं तोंड बंद का आहे?," असा सवालही त्यांनी केला. (Shivsena leader  Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang rape)  

ती नटी कुठे आहे?; हाथरसच्या घटनेवरून राऊतांनी कंगनाला डिवचले
| Edited By: | Updated on: Oct 02, 2020 | 5:46 PM
Share

मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथसर बलात्कार प्रकरणात देशभरात संतापाची लाट उसळून आली आहे. या प्रकरणावरुन संजय शिवसेना खासदार संजय राऊतांनी अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपाई नेते रामदास आठवले यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. “एखाद्या नटीची भिंत पाडल्याचा हे प्रकरण नाही. ती नटी आता कुठे आहे ? अनेक अनुसुचित जातीतील नेते त्या नटीच्या संरक्षणासाठी पुढे आले ते कुठे आहेत?” असा संतापजनक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Shivsena leader  Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang rape)

“एका नटीचं अनधिकृत बांधकाम पाडलं म्हणून तिच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे असलेले दलित नेते आता कुठे आहेत? अनुसुचित जातीतील नेते कुठे गेलेत त्याची खरंतर एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच हाथरसप्रकरणी कंगना रानौतचं तोंड बंद का आहे?,” असा सवालही त्यांनी केला.

“उत्तरप्रदेशातील मीडियाच्या स्वातंत्र्यावर सामुहिक बलात्कार केला गेला. त्या मुलीचा मृतदेह जाळला. याप्रकरणी देशभरात आक्रोश आहे. तिचे अत्यसंस्कार विधीवत झाले नाहीत. पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळण्यात आला. स्वत:चे पाप जाळण्याचे प्रयत्न केला गेला. हिंदुत्वाच्या राज्यात हा प्रकार घडला. रामराज्य म्हणवलं जातं. पण सितामाईसुद्धा आक्रोश करत असेल,” असेही ते म्हणाले.

“या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातो. त्या कुटुंबाला दहशतीत आणून धमक्या दिल्या जात आहेत. गांधी कुटुंबियांचं देशासाठी खूप मोठं योगदान आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना काल जी वागणूक दिली गेली ती अत्यंत चुकीची आहे. ज्यांनी या देशासाठी घामाचा आणि रक्ताचा एक थेंबही सांडला नाही ते आज हे करत आहेत,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

“येत्या 24 तासात आम्ही बिहार निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. ही निवडणूक लढली पाहिजे या मताचा मी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत,” असेही राऊतांनी सांगितले.

“हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरेतर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेवर बोलावं. जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. हाथरसच्या घटनेमुळे देशभर सन्नाटा पसरला आहे. लोकांना त्यावर व्यक्त व्हायचं आहे. पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच लोकं मौन आहेत,” असंही ते म्हणाले. (Shivsena leader  Sanjay Raut On Hathras Uttar Pradesh Gang rape)

संबंधित बातम्या : 

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

कंगनाच्या मतांशी आम्हीही सहमत नाही, पण याचा अर्थ तिचं घर पाडावं असा नाही, उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.