बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. | Sanjay Raut

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:09 AM

मुंबई: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ओबामा यांना अशाप्रकारे भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांनी भारतीय नेत्यांबाबत बोलणं चुकीचं आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. (Shivsena backs Rahul Gandhi after Barack Obama comment in A Promised Land)

ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी हे खूप चांगले काम करत असल्याचा दावा केला. बराक ओबामा यांनी त्यांच्याविषयी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. ओबामांनी एक वक्तव्य केलं अन् इथल्या नेत्यांनी त्याचं राजकारण केलं, ही गोष्ट चुकीची आहे. उद्या ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलले तरीही माझी भूमिका हीच असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

बराक ओबामा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले होते. राहुल गांधी यांना देशातील बदनामी कमी पडत होती की काय म्हणून आता ते परदेशातही स्वत:ची बदनामी करून घेत असल्याची खोचक टीका भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी केली होती.

काय म्हणाले होते बराक ओबामा? बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये या पुस्तकाचे परीक्षण छापून आले होते. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत.

यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना देशातील बदनामी कमी पडते म्हणून आता परदेशातही स्वत:ची बदनामी करुन घेतायत: गिरीराज सिंह

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

Shivsena backs Rahul Gandhi after Barack Obama comment in A Promised Land)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.