राम जन्मभूमी आमच्या आत्मियतेचा विषय, निमंत्रण कोणाला द्यायचे मंदिर समितीचा निर्णय : अनिल परब

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना देण्यात आलेले (Anil Parab On Ayodhya Ram Mandir Temple) नाही.

  • सुनील काळे, दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 18:35 PM, 28 Jul 2020
राम जन्मभूमी आमच्या आत्मियतेचा विषय, निमंत्रण कोणाला द्यायचे मंदिर समितीचा निर्णय : अनिल परब

मुंबई : येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या अयोध्येत सुरु आहे. मात्र या सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “राम जन्मभूमी आमच्या आत्मियतेचा विषय आहे. त्यामुळे त्यापासून आम्हाला कोण वेगळं करू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. (Anil Parab On Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)

“अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण कोणाला द्यायचे हा मंदिर समितीचा निर्णय आहे. मात्र राम जन्मभूमी आमच्या आत्मियतेचा विषय आहे. त्यापासून आम्हाला कोणी वेगळं करु शकत नाही,” असे अनिल परब म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र मंत्रोचाराच्या जयघोषात भूमिपूजन करतील. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल. अयोध्येत त्या पवित्र सुवर्ण मुहूर्तासाठी जोमात तयारी चालली आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे. निश्चित मुहूर्त आणि दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्याची तयारी यानुसार पूजा केली जाईल.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्याचप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी नेते विनय कटीयार, कल्याण सिंह यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल” (Anil Parab On Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)

संबंधित बातम्या : 

Ayodhya | पंतप्रधान मोदींचे भाषण, 200 पाहुणे, राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला