
Shivsena MLA Disqualification Case | बाळासाहेब भवनात संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 4.30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात करणार आहेत. निकाल कोणाच्या बाजून लागणार? त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? मुख्यमंत्री बदल होणार का? नवीन समीकरण आकाराला येणार का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतील.
संजय शिरसाट यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– देशात एका उठावानंतर आलेली ही परिस्थिती आहे, त्यावर जो निकाल येणार तो फक्त महाराष्ट्रातपुरता मर्यादीत राहणार नाही. देशभरातील विधानसभा आहेत, तिथे अशी परिस्थिती उदभवली तर काय? त्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा असणार आहे.
– हा निकाल काहीही लागला, तरी हा निकाल सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार. मग ही अध्यक्षांची जबाबदारी आहे की, मी दिलेला निकाल सुप्रीम कोर्टात कायम राहिला पाहिजे. तो घटनेच्या चौकटीत असला पाहिजे, कुठेही सुप्रीम कोर्टाकडून कमेंट होता कामा नये, त्या दृष्टीने राहुल नार्वेकर वकील असल्याने व्यवस्थित निकाल दिला जाईल अशी अपेक्षा शिरसाट यांनी व्यक्त केली.
– काहींनी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. काही अनावश्यक गोष्टी केल्या. कारण त्यांना त्यांचा पराभव दिसून आला. त्यांनी हार मान्य केली, असं संजय शिरसाट म्हणाले.
– नाचता येईन अंगण वाकडं, अशी त्यांची स्थिती आहे. निकाल विरोधात जाईल, म्हणून त्यांनी आधीच विरोधात बोलायला सुरुवात केली आहे असं शिरसाट म्हणाले.
– आमदार पात्र-अपात्रतेसाठी शेड्युल 10 आम्हाला लागू होत नाही. ठाकरे गटाचा त्याच्यावरच भर होता. आम्ही कोणताही गट स्थापन केलेला नाही. कुठल्याही पक्षात विलिन झालेलो नाही. आम्हीच शिवसेना आहोत, हे वारंवार सांगितलं, म्हणून आम्हाला शेड्युल 10 लागू होत नाही असं शिरसाट म्हणाले.
– अध्यक्षांच्या अधिकारात जो निर्णय आहे, ते तो घेतली. काहीवेळा सुनावणीला मी उपस्थित होतो. त्यांची आरग्युमेंट विचित्र होती, असं शिरसाट म्हणाले. भविष्यात हा निकाल महत्त्वाचा ठरणार. त्यांची उलट तपासणीत गोची झाली. सगळ अंगलट येईल, आमचा उठाव कायेदशीर आहे, याची त्यांना जाणीव आहे. त्यांचे 14-15 आमदार अपात्र होतील, याची भीती आहे असं शिरसाट म्हणाले.