AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Vs BJP | मुंबईतल्या ‘या’ भागात उर्दू लर्निंग सेंटरवरुन शिवसेना-भाजपा आमदार आमने-सामने

Shivsena Vs BJP | महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. पण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कुरबुरी, मतभेद होतात. आता मुंबईतल्या भायखळ्यात असच घडलं आहे. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आमने-सामने येतात.

Shivsena Vs BJP | मुंबईतल्या 'या' भागात उर्दू लर्निंग सेंटरवरुन शिवसेना-भाजपा आमदार आमने-सामने
Yamini Jadhav
| Updated on: Dec 25, 2023 | 9:19 AM
Share

गिरीश गायकवाड

Shivsena Vs BJP | महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा एकत्र सत्तेमध्ये नांदत आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. महायुतीच्या या सरकारमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. पण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कुरबुरी, मतभेद असतात. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आमने-सामने येतात. भायखळ्यातही असचं आहे. भायखळ्यातून शिवसेनेच्या यामिनी जाधव आमदार आहेत. मागच्यावर्षी शिवसेनेत बंड झालं, त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

आता भायखळा आग्रीपाडा येथे ऊर्दू लर्निंग सेंटरच्या जागेचा वाद आहे. त्यावरुन भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदार यामिनी जाधव आमने-सामने आहेत. यामिनी जाधव यांनी मागणी केली की, त्या ठिकाणी ऊर्दू लर्निंग सेंटर व्हावं तर मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी आयटीआयची इमारत तयार व्हावी.

किती कोटीच काम?

ऊर्दू लर्निंग सेंटरचं 40 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यामिनी जाधव यांची विधान सभेत दिली. 12 कोटींच्या या कामात बऱ्याच नियमांच उल्लंघन झाल्याचा मिहीर कोटेचा यांचा आरोप आहे. या जागेवर आयटीआय व्हावं असा प्रस्ताव होता, पण मविआ सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवून इथे ही जागा ऊर्दू लर्निंग सेंटरला दिली, असं कोटेचा यांचं म्हणणं आहे.

दोघेही आमने-सामने

या जागेचं 45 लाख भाडं आयटीआयने थकवल्याने याचं आरक्षण मनाने बदलून इतर शिक्षण विभागास जागा भाडेतत्वावर दिलीय. या प्रकरणानंतर आत्ता शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि भाजपचे मिहीर कोटींचा हे आमने सामने आल्याचं पहायला मिळतंय.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.