ओमराजे निंबाळकर हल्ला प्रकरण, जेलमधून पळालेला आरोपी सापडला, मंदिरातून जेरबंद

उस्मानाबाद शहराजवळ असलेल्या शिंगोली गावातील एका मंदिरात अजिंक्य टेकाळे लपून बसला होता.

ओमराजे निंबाळकर हल्ला प्रकरण, जेलमधून पळालेला आरोपी सापडला, मंदिरातून जेरबंद

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरील चाकू हल्ला प्रकरणातील जेलमधून पळालेला आरोपी सापडला आहे. उस्मानाबाद शहराजवळ मंदिरात लपलेल्या अजिंक्य टेकाळे याला पुन्हा जेरबंद करण्यात आले. उस्मानाबाद शहराजवळ असलेल्या शिंगोली गावातील एका मंदिरात अजिंक्य टेकाळे लपून बसला होता. (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack Absconding Accuse detained in Osmanabad)

विधानसभा निवडणुकीवेळी हल्ला

विधानसभा निवडणुकीच्या वेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. 16 ऑक्टोबर 2019 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे हा प्रकार घडला होता. हातावर वार झाल्याने त्यांना जखम झाली होती.

असा झाला होता हल्ला

खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले, तेव्हा त्यांच्याजवळ आरोपी आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला.

दुसऱ्या हाताने चाकू काढत त्याने निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराचा पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न चुकवत ओमराजेंनी हात अडवा धरला. त्यामुळे त्यांच्या हातावर चाकूचा वार झाला.

चाकू हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे याला अटक करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यांपासून टेकाळे उस्मानाबाद जेलमध्ये होता. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आले होते. (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack Absconding Accuse detained in Osmanabad)

आरोपी कसा पळाला?

वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जेलमध्ये परतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. मात्र काही तासातच त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

संबंधित बातम्या :

ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार 

(Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack Absconding Accuse detained in Osmanabad)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI