Eknath Shinde: जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत बोलणार नाही, संजय राऊत एकनाथ शिंदेंबद्दल काय काय बोलले ते वाचा

Eknath Shinde: आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. या सर्वांना गुजरातमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील काही आमदारांना परत यायचं आहे. पण त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

Eknath Shinde: जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत बोलणार नाही, संजय राऊत एकनाथ शिंदेंबद्दल काय काय बोलले ते वाचा
जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत बोलणार नाही, संजय राऊत एकनाथ शिंदेंबद्दल काय काय बोलले ते वाचाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:14 AM

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेची (shivsena) पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. त्यांची बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठा आहे. ते कुठे जाणार नाहीत. काही नाराजी नक्कीच आहे. ती बोलून दूर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री नेहमीच सर्वच खात्यांचा आढावा घेत असतात. प्रत्येक खात्याचा ते राज्याचे प्रमुख या नात्याने आढावा घेत असतात. त्यामुळे त्याला ढवळाढवळ म्हणता येत नाही, असं संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि आमदारांशी संपर्क झाला आहे, असा दावाही राऊत यांनी केला. मात्र, काय बोलणं झालं हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. या सर्वांना गुजरातमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील काही आमदारांना परत यायचं आहे. पण त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांना परत येऊ दिलं जात नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न करण्याचा हा प्रयत्न आहे, असं सांगतानाच हे सर्व आमदार जुने शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या पडत्या काळातही ते आमच्या सोबत होते. ते निष्ठावंत आहेत, ते परत येतीलच, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

मीडियातून जसे चित्र निर्माण केलं आहे. तसं काही भूंकप वगैरे नाही. नक्कीच काही गोष्टी संशयास्पद आहेत. त्याबाबत वर्षावर सर्वांची बैठक होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण हा पॅटर्न चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही, असं सांगतानाच महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.

आमदारांना सुरतलाच का नेलं?

महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईवर ताबा मिळवण्याची लोढा यांची कालची भाषा होती. मुंबईवर ताबा म्हणजे नेमकं यांना काय हवंय? असे प्रयत्न त्यांनी आधीही केले आहे. शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलं होतं. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वत:ला विकरणाही औलाद महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. जे बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहतोय. अनेक आमदार आता वर्षावर येत आहेत. अनेक नावं आम्ही पाहतोय. जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की आम्हाला काय झालंय कळत नाही. हे आमदार गुजरातमध्ये, सुरतमध्ये आहेत. त्या आमदारांची व्यवस्था भाजप नेते आरसी पाटील करत आहे. सुरतलाच का नेलं? ज्या क्षणी आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.