मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मधल्या काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या भेटीबाबत अधिक माहिती दिली आहे. आपण राहुल गांधी यांना शिवसेना म्हणजे काय? शिवसेना नेमकी कशी काम करते? याबाबत एका वाक्यात सांगितल्याचं राऊतांनी म्हटलंय. ‘फटे लेकीन हटे नही’ हे शिवसेनेचं धोरण असल्याचं आपण राहुल गांधींना सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला. (What is ShivSena? MP Sanjay Raut told Rahul Gandhi in one sentence)