चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका, राऊत म्हणाले मी थेट त्यांना फोनच केला, पण नेमकं काय उत्तर दिलं?

खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही पुढील पंचवीस वर्षे माजी मंत्रीच राहणार असं थेट फोन करुन सांगितलं आहे. चेंबूरमध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी ही महिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका, राऊत म्हणाले मी थेट त्यांना फोनच केला, पण नेमकं काय उत्तर दिलं?
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 8:05 PM

मुंबई : मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत कळेल असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही पुढील पंचवीस वर्षे माजी मंत्रीच राहणार असं थेट फोन करुन सांगितलं आहे. चेंबूरमध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी ही महिती दिली आहे. संजय राऊतांनी फोन करुनच चंद्रकांत पाटलांना त्यांच्या कोड्यात टाकणाऱ्या वक्तव्याला उत्तर दिल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. (you will be former minister for upcoming 25 years said shiv sena leader sanjay raut to bjp leader chandrakant patil)

फोन करुन सांगितलं तुम्ही 25 वर्षे माजी मंत्रीच राहणार

संजय राऊत आज चेंबूरमध्ये शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेची जडणघडण तसेच पक्षाचा संघर्ष याविषयी सविस्तर भाष्य केले. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचेही कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसांत कळेलच असे चंद्रकांत पाटील पुण्यात बोलताना म्हणाले होते. त्यानंतर एक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्याबाबत बोलताना “मी स्वत: पाटलांना फोन करुन पुढचे पंचवीस वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असे चंद्रकांत पाटलांना सांगितले,” असे राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला 150 जागा हव्यात, असेही राऊत म्हणाले.

राहुल यांना शिवसेना म्हणजे काय एका वाक्यात सांगितलं 

“चेंबूर असेल तसेच इतर ठिकाणं शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. मध्यंतरी माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीची खूप चर्चा झाली. राहुल गांधी यांनी शिवसेनेच्या रचनेविषयी, कार्याविषयी समजून घेतलं. त्यांनी मला एका वाक्यात शिवसेना काय आहे ? हे विचारलं. त्याला उत्तर म्हणून आम्ही असे आहोत की एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. फटे लेकीन हटे नही असं आमचं असतं. आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही,” असं राऊत म्हणाले. तसेच शिवसेना असंख्य वार आणि घाव घेऊन इथपर्यंत आली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे. जी आंदोलनं आपण केली त्याच पुण्याईवर आज शिवसेना उभी आहे, याची आठवणही राऊत यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली.

इतर बातम्या :

आदिवासीबहुल जिल्ह्यात ओबीसी आणि खुल्या वर्गावर होणारा अन्याय दुसरीकडे भरून काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय

‘आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल’, चंद्रकांत दादांचा सावधगिरीचा इशारा

प्रविणजी, राजकारणाच्या पलीकडं म्हणजे नेमकं कुठं जायचं? अनेकांना दिल्लीत उभं राहावं लागतं बसायला मिळतं नाही, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

(you will be former minister for upcoming 25 years said shiv sena leader sanjay raut to bjp leader chandrakant patil)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.