AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर पाकड्यांच्या दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी जगाला दिला, राऊतांच्या निशाण्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान

आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर टीका केली आहे. इमरान खान यांनी दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा जगाला दिल्याचं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

...तर पाकड्यांच्या दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी जगाला दिला, राऊतांच्या निशाण्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान
संजय राऊत
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 30, 2021 | 7:26 AM
Share

मुंबई : आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्यावर टीका केली आहे. इम्रान खान यांनी दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा जगाला दिल्याचं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे. अत्यंत क्रूर व्हिडीओ जारी करणारे तालिबानी (Taliban) म्हणजे सज्जन नागरिक आहेत, असे इमरान मियाँना वाटत असेल तर पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिलाय, अशी टीका राऊतांनी केलीय.

पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा

बामियानमधील भगवान बुद्धाच्या मूर्ती स्फोटकांनी उडविणारे, बुरखा घातला नाही म्हणून महिलांचे गळे चिरून हत्या करणारे, किरकोळ कारणावरून आपल्याच नागरिकांवर गोळ्यांचा वर्षाव करणारे , क्रूर कत्तली व हत्याकांडे घडवून त्याचे व्हिडीओ जारी करणारे तालिबानी म्हणजे सज्जन नागरिक आहेत, असे इम्रान मियाँना वाटत असेल तर पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

‘तालिबानी म्हणजे सर्वसामान्य नागरिक’, इम्रान खान यांचं अजब वक्तव्य

अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सर्व सैन्य माघारी घेत आहे आणि तिथे पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची चिन्हे दिसत असल्याने इम्रान खान यांना तालिबानप्रेमाचे भरते आले असावे. त्यामुळे ‘तालिबानी म्हणजे सर्वसामान्य नागरिक’ असे विधान इम्रान यांनी केले असावे. पण हे वक्तव्य म्हणजे दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा असल्याचं अग्रलेखात म्हटलंय.

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ही म्हण इम्रान खान यांच्यासाठी तंतोतंत लागू

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ अशी एक मराठी म्हण आहे. बेताल बडबडीसाठी कुप्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. ‘तालिबानी लोक हे तर सामान्य नागरिक आहेत,’ असा दिव्य विचार इम्रान मियाँनी मांडला आहे.

अमेरिकेच्या वृत्तवाहिनीला मुलाखत, तालिबान्यांवर स्तुतिसुमने

अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी तालिबान्यांवर स्तुतिसुमने उधळली आणि अमेरिकेच्या चुकांचा पाढा वाचला. अफगाणिस्तानातील विद्यमान स्थितीबद्दल अमेरिकाच जबाबदार आहे. अमेरिकेने तालिबान्यांना योग्य प्रकारे हाताळले नाही, तालिबानी काही लष्करी पोषाखात नसतात हे अमेरिकेला समजले नाही आणि अमेरिकेमुळेच अफगाणिस्तानची परिस्थिती आज बिकट झाली, असा आरोप इम्रान यांनी केला.

अमेरिकेच्या चुका जरूर असतील, परंतु जगभरातील अतिरेकी संघटनांचे आश्रयस्थान असलेल्या आणि दहशतवादाला कायमस्वरूपी रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेच्या चुका दाखविण्याचा नैतिक अधिकार आहे काय, हा खरा प्रश्न आहे.

इम्रान खान यांचं ते विधान म्हणजे शतकातील सर्वांत मोठा विनोद

ज्या तालिबानने आजवर अफगाणिस्तानात हजारो निरपराध लोकांचे बळी घेतले, शेकडो हत्याकांडे घडविली ते तालिबानी राक्षस म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत, हे इम्रान खान यांचे विधान म्हणजे या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. मुळात तालि बान काय चीज आहे हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. असे असताना तालिबानचे प्रवक्ते असल्याच्या थाटात इम्रान खान यांनी तालिबानची नसती ओळख करून देत स्वतःचेच हसे करून घेतले आहे. अर्थात कश्मीरमध्ये मारल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांचा ‘शहीद’ असा उल्लेख करणाऱ्या पाकिस्तान्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार!

पाकिस्तानने केलेले सर्व दावे तद्दन खोटे हे सिद्ध झालं

उलट तालिबानी म्हणजे अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर धाडलेले थोर संतमहात्मे व देवदूत आहेत, असा उल्लेख इम्रान मियाँनी केला नाही हे नशीबच म्हणायचे. आम्ही तालिबानचे समर्थक नाही किंवा पाकिस्तानने तालिबान्यांना आश्रय दिलेला नाही, असे दावे हजारेक वेळा तरी पाकिस्तानच्या पंतप्रधान व लष्करप्रमुखांनी आजवर केले असतील. मात्र, खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानचा कैवार घेऊन त्यांना निरागस ठरविण्यासाठी जी वकिली केली आहे, त्यामुळे पाकिस्तानने आजवर केलेले सर्व दावे तद्दन खोटे होते हे आपोआपच सिद्ध झाले.

भारताला अणुबॉम्बच्या धमक्या देणाऱ्या पाकने अमेरिकेला जाब का विचारला नाही?

अमेरिकेने ‘9/11’ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई करून तालिबान्यांची राजवट उलथवून लावली, तेव्हापासून पाकिस्ताननेच तालिबान्यांना पोसले. अमेरिका आणि तालिबान यांच्यातील संघर्षात खुद्द पाकिस्तानचेही 70 हजारहून अधिक नागरिक मरण पावले, असे इम्रान खान यांनी याच मुलाखतीत सांगितले आहे. अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून तालिबानी अतिरेकी पाकिस्तानच्या गोधडीत दबा धरून बसत होते, म्हणून तर अमेरिकेने पाकिस्तानच्या हद्दीत हल्ले चढविले.

या हल्ल्यांत गव्हासोबत किडे रगडावेत तसे पाकिस्तानचे असंख्य निरपराध नागरिकही मरण पावले. एरवी भारताला विरोधात ऊठसूट अणुबॉम्बच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने त्यांचे 70 हजार नागरिक मारल्याचा जाब अमेरिकेला का विचारला नाही, हा प्रश्नही उरतोच. तालिबान्यांचे पालनपोषण केल्यामुळेच पाकड्यांनी तोंड दाबून हा बुक्क्यांचा मार निमूटपणे सहन केला.

(Shivsena Sanjay Raut Attacked on Imran Khan through Saamana Editorial Over Taliban Statement)

हे ही वाचा :

राज्य सरकारचा 15 टक्के फी सवलतीचा निर्णय निव्वळ धूळफेक, मविआ सरकार शिक्षण सम्राट धार्जिणे, अतुल भातखळकर यांचा आरोप

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण