मुंबई ते अयोध्या, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदार उद्या अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. हा दौरा कसा असेल याचे संपूर्ण वेळापत्रक 'टीव्ही 9 मराठी' हाती लागले आहे. 

मुंबई ते अयोध्या, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक
Follow us
| Updated on: Jun 15, 2019 | 11:21 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या (16 जून) अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदार अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. हा दौरा कसा असेल याचे संपूर्ण वेळापत्रक ‘टीव्ही 9 मराठी‘ हाती लागले आहे.

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांसह अयोध्येत गेले होते. ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणाही याआधी उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, भाजपशी युती झाली आणि उद्धव ठाकरे घोषणा विसरुन, निवडणुकीच्या कामाला लागले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागीही झाली.

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत राम मंदिर उभारणीबाबत आपली भूमिका व्यक्त केली होती. “भाजपकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेचे 18 खासदार आहेत. राम मंदिर उभारणीसाठी आणखी काय हवंय?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी स्वपक्षाच्या सत्ताधाऱ्यांनाच उद्देशून विचारला होता.

लोकसभेचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवस्थांनांचं दर्शन घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन ठाकरे कुटुंबीयांचं कुलदैवत अससेल्या कार्ल्याच्या एकविरा देवीच्या दर्शन केले. त्यानंतर कोल्हापुरात जाऊन करवीर निवासिनी अंबाबाईचंही उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांसोबत दर्शन घेतले आणि आता यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहे.

दरम्यान, उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन काय बोलतात, राम मंदिराबाबत काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल?

  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सकाळी 5.30 वाजता अयोध्येसाठी मातोश्रीहून निघणार
  • सकाळी 5.45 च्या सुमारास ठाकरे कुटुंबीय मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी रवाना होतील
  • त्यानंतर सकाळी 8 वाजता फैजाबाद एअरपोर्टवर विमानतळावर ठाकरे कुटुंबीय उतरणार
  • सकाळी 8.30 वाजता ठाकरे कुटुंब पंचशील हॉटेलवर पोहोचणार
  • त्यानतंर सकाळी 9.30 च्या सुमारास सर्व खासदार राम जन्मभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित राहणार
  • सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राम जन्म भूमी दर्शनासाठी येणार
  • त्यानंतर सकाळी 11 वाजता पंचशील हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार
  • दुपारी 1 वाजता ठाकरे कुटुंब मुंबईसाठी विमानाद्वारे रवाना होणार
  • दुपारी ३ वाजता ठाकरे कुटुंब मुंबई विमानतळावर दाखल होणार
  • दुपारी ३:३० वाजता ठाकरे कुटुंब मातोश्रीवर दाखल होतील
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.