शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन

सुनील सुर्वे हे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते.

शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन

उल्हासनगर : शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन झालं. उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील सुर्वे हे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. सुनील सुर्वे यांनी 25 दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती. (Shivsena Ulhasnagar Corporator Sunil Surve Dies)

सुनील सुर्वे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जवळपास 23 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून ते घरी आले होते.

सुनील सुर्वे यांना 15 दिवसांपूर्वी पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून त्यांच्यावर घरीच उपचार करून ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी त्रास वाढल्यानंतर सुर्वे यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुर्वे यांची बायपास झाली होती, शिवाय त्यांचे डायलिसिसही करावे लागत होते.

हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक होते. 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अभ्यासू असलेले सुर्वे हे महापालिका सभागृह दणाणून सोडत असत. त्यांच्या निधनाने संघटनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ,असे शिवसेनेचे ज्येष्ठ  नगरसेवक आणि शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

उल्हासनगरच्या मराठा पट्ट्यातील खंदे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सुनील सुर्वे गेली अनेक वर्ष सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी झटत होते. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्याचे रुंदीकरण होण्यामागे त्यांचा मोठा वाटा आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सुनील सुर्वे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपदही भूषवले आहे. सुर्वे यांनी 2017 मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या सुर्वेंनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारल्याने ते चर्चेत आले होते.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

(Shivsena Ulhasnagar Corporator Sunil Surve Dies)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *