होऊन जाऊ द्या, अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार : शिवसेना

मुंबई : ‘युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) अस्मान दाखवू, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. त्यावर ‘आता होऊन जाऊद्या, शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेचं, येऊ दया अंगावर, होऊ दया सामना, हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली आहे. लातूरमध्ये मराठवाड्यातील […]

होऊन जाऊ द्या, अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार : शिवसेना
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : ‘युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) अस्मान दाखवू, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. त्यावर ‘आता होऊन जाऊद्या, शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेचं, येऊ दया अंगावर, होऊ दया सामना, हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली आहे.

लातूरमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांशी आणि बूथ प्रमुखांशी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेसोबतच्या युतीवरुन अमित शाह म्हणाले की, ‘युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) अस्मान दाखवू’.

अमित शाहांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेनेही सडेतोड उत्तर दिले आहे. ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरुन त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि ‘हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फीर सरकार’ असा नारा दिला. तो झोंबल्यामुळेचं आणि शिवसेनेच्या आसुड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली. आता भाजप नेत्यांच्या जीभा ही सरकू लागल्या आहेत. एकंदर चांगलेच झाले, भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच दिसते आहे.’

‘पाच राज्यांच्या निकलानंतर तसेही भाजपचे अवसान गळले आहेच, भारतीय जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहेच. लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली इव्हीएमशी युती होणार हे जाहीर केलं आहे. तसेही त्यांच्या अनिल गोटे नावाच्या आमदाराने धुळे महानगर पालिकेत यांचे भांडे फोडले आहे. आता होऊन जाऊद्या, शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच, येऊ दया अंगावर, होऊ दया सामना, हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही.’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.

युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. शिवसेना सोबत आली नाही तरीही आपण 48 पैकी 40 जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. निवडणूक होईपर्यंत घरी येणार नाही, असं अगोदरच कुटुंबीयांना सांगून ठेवा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना भाजपने आता एकमेकांवर खुलेआम निशाणा साधल्याने सध्या महाराष्ट्रातील राजकिय वातावरण तापलेलं दिसतं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.