‘भाजप कार्यकर्त्यांसाठी एकनाथ खडसेंचा राजीनामा धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा’

पक्षात न्याय आणि अन्याय होत असतो. मात्र, हे प्रश्न चर्चेतून सुटू शकतात. | Eknath Khadse

'भाजप कार्यकर्त्यांसाठी एकनाथ खडसेंचा राजीनामा धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा'
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 2:27 PM

नागपूर: एकनाथ खडसे यांचा भाजप सोडण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी धक्कादायक आणि मन विषण्ण करणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. भाजप पक्ष वाढवण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे खडसे यांनी आपला निर्णय बदलावा, असे मला वाटते. राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये त्यांचे मन रमणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. (Sudhir Mungantiwar reaction on Eknath Khadse quit BJP )

एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. पक्षात न्याय आणि अन्याय होत असतो. मात्र, हे प्रश्न चर्चेतून सुटू शकतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी कोणत्या विचाराने पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, हे मला कळत नाही. चार दिवसांपूर्वीच माझे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यावरुन खडसे इतक्यात पक्ष सोडतील, असे मला वाटले नव्हते. मात्र, आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला धक्का बसला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडल्यामुळे भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीतीही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल- राम शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत बातमी जाहीर केली. भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसेंना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होईल, असं राम शिंदे म्हणाले.

एकनाथ खडसे यांना जी किंमत भारतीय जनता पक्षात मिळत होती, ती राष्ट्रवादीत मिळणार नाही. त्यांच्याबरोबर असा कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी जी हिंमत केली, त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राम शिंदे म्हणाले. संबंधित बातम्या:

Eknath Khadse | पहिल्या निवडणुकीत पराभव ते 30 वर्ष मुक्ताईनगरवर अधिराज्य, एकनाथ खडसेंची कारकीर्द

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’

मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट   

(Sudhir Mungantiwar reaction on Eknath Khadse quit BJP )

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.