संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना अचानक ‘मातोश्री’वरुन बोलावणं

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना अचानक 'मातोश्री'वरुन बोलावणं
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 3:50 PM

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. जरी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला आज बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाची विचारपूस केली असं सुनील राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

‘सजंय राऊतांना लवकरच जामीन मिळेल’

सजंय राऊत यांना जामीन कधी मिळणार? याबाबत बोलताना सुनील राऊत म्हणाले की, सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की संजय राऊत  यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल.

दसरा मेळावा हा शिवसेनेचा होता हा इतिहास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. पुढे उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. कोणीही कितीही दावा केला तर ओरिजनल ते ओरिजनल आणि गद्दार ते गद्दराच राहणार आहेत, असेही सुनील राऊत याववेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंवर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे.  सध्या मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आहेत, मात्र प्रत्यक्षात सरकार मात्र देवेंद्र फडणवीस हे चालवतात. सरकार चालवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री मजबूत होते, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं आहे, ते जगातला कुठलाही मुख्यमंत्री करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच कोरोना अटोक्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी कोरोना काळात निर्बंध घातला म्हणूनच आपण यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करू शकत आहोत.  असंही यावेळी सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.