Eknath Khadse : शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होऊ शकतं; नाथाभाऊंचं मोठं विधान

Eknath Khadse : सरकारने योग्य भूमिका मांडली असती तर सर्वोच्च न्यायालयाने याचा फेरविचार केला असता. काय असेल नसेल ते करा. पण कोर्टात पुनर्विचाराची याचिका दाखल करून ओबीसींना आरक्षण मिळवून द्या. नाही तर ओबीसींवर कायमचा अन्याय होईल, असं खडसे म्हणाले.

Eknath Khadse :  शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होऊ शकतं; नाथाभाऊंचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 8:52 AM

जळगाव: राज्यात सत्तांतर होणार असल्याचं विधान शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनीही शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होऊ शकते, असा दावा केला आहे. राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार? याबाबत सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असे मत खडसे यांनी व्यक्त केल आहे.

शिंदे गटाविरोधातील याचिकांवर येत्या 1 तारखेला निर्णय होणार आहे. यातच सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या 10 व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत. हे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. अरुणाचल प्रदेशच्या नाबिया सरकारचा जो निर्णय झाला, ती परिस्थिती आणि आपली परिस्थिती जवळपास सारखी आहे. त्यामुळे या सरकारला स्थिरता नाही. त्यामुळे हे सरकार राहणार की नाही याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकतं, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमच्यामुळे आरक्षण गेल्याचं सांगा ना?

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्देवी आहे. ओबीसींवर अन्याय करणारा आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणासहीतच झाल्या पाहिजे. ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणं योग्य होणार नाही. मागे आरक्षण मिळालं आणि त्याचा गाजावाजा फडणवीसांनी केला. आम्ही आरक्षण मिळावलं असं शिंदेगट आणि फडणवीस सांगत होते. आता आरक्षण गेल्याने ढोलवाजवून सांगा आमच्यामुळे आरक्षण गेलं म्हणून. सरकारच्या दुर्लक्षणापणामुळे ओबीसींवर अन्याय झाला. या सरकारने ओबीसींची योग्य भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं आहे. सरकारने योग्य भूमिका मांडली असती तर सर्वोच्च न्यायालयाने याचा फेरविचार केला असता. काय असेल नसेल ते करा. पण कोर्टात पुनर्विचाराची याचिका दाखल करून ओबीसींना आरक्षण मिळवून द्या. नाही तर ओबीसींवर कायमचा अन्याय होईल, असं खडसे म्हणाले.

राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राज्यात सत्तांतर होणार असल्याचं म्हटलं होतं. राज्यात सत्तांतर होणार या मताशी मी ठाम आहे. प्रत्येकाचे एक स्वप्न असते, कोणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता आणायची आहे. पण लोकशाही मार्गाने आम्हाला लोकशाही आणायचे आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही लोकांपर्यंत जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता आणायची आहे. ती वेळ लवकर येईल, असं त्यांनी म्हटल होतं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.