“जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये”, मविआच्या नेत्यांचं एकसूर
जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याची घोषणा केली.त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांच्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आव्हाडांनी राजीनाम्याची घोषणा केली.त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आव्हाड यांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलंय. शिवाय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही तशीच विनंती आव्हाडांना केलीय.
सुप्रिया सुळे म्हणाल्या
मी जितेंद्र आव्हाड यांना विंनती करते की, त्यांनी राजीनामा देऊ नये. ते उत्तम आमदार आहे. मतदार संघासाठी त्यांनी चांगलं कामन केलंय. लोकांनी त्यांना प्रेमाने निवडून दिलं आहे. मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विंनती करते की कृपया राजीनामा देऊ नका. आपण लढवय्या नेते आहात. आपण ही लढाई लढायला हवी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दानवे काय म्हणाले?
अंबादास दानवे यांनी आव्हाड यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर भाष्य केलंय. आव्हाडांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा शिंदे-भाजपत्या नेत्यांचा सत्तेचा माज आहे. सरकार विरोधात आवाज उचलणार त्याचा आवाज बंद करायचा, अशी भूमिका घेतली जात आहे. यामागे कुठली शक्ती आहे त्याचा तपास झाला पाहिजे, असं दानवे म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा न देता लढाई लढली पाहिजे. शिवसेना आणि महाविकास आघाडी आव्हाडांसोबत आहे.भाजपचा जरी आमदार राहिला असता तरी आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो असतो, असंही दानवे म्हणालेत.
