Supriya Sule : ‘सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला’, एसटी कर्मचाऱ्यांच्या राड्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

'सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता आणि माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला आहेट, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule : सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला, एसटी कर्मचाऱ्यांच्या राड्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 7:03 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी तुफान राडा घातला होता. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे सिल्व्हर ओकवर (Silver Oak) धडक देत बांगड्या फोडल्या, चप्पल आणि दगडफेक केली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना समोरं जात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या घरावरील हा हल्ला वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सदावर्तेंना अटकही करण्यात आली. दरम्यान, या हल्लाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. ‘सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता आणि माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला आहेट, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या औरंगाबादेत बोलत होत्या. दरम्यान, सुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पवारांच्या घरावरील हल्ल्याचा विषय चर्चेत आलाय.

8 एप्रिलला पवारांच्या निवासस्थानावर हल्ला

शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर 8 एप्रिल रोजी दपारी 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे हल्ला चढवला होता. महत्वाची बाब म्हणजे राज्याची गुप्तचर यंत्रणा किंवा मुंबई पोलिसांनाही या हल्ल्याची माहिती मिळू शकली नाही. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर बाटल्या आणि चपलाही फेकल्या. आंदोलकांना शांत करण्यासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं. मात्र, एसटी कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नजिकच्या पोलीस ठाण्यात नेलं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांतता राखत चर्चेसाठी पुढे या असं आवाहन केलं होतं.

माझ्या घरावरील हल्ला दुर्दैवी – सुळे

मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असं पहिल्यांदाच घडतंय. माझी हात जोडून विनम्रपणे विनंती आहे. चर्चेला बसायची माझी तयारी आहे. आपण चर्चेला बसू शकतो. आपण याआधीही बसलेलो आहोत. जे काही करायचं, ते शांततेनं करुयात. काल जे जल्लोष करत होते, ते आज अचानक आंदोलनावर का उतरले? माझ्या घरावर आज मोठा हल्ला झाला आहे. हा दुर्दैवी आहे. आम्हाला या सगळ्यातून सुरक्षित ठेवल्यावरुन मी एवढंच बोलू शकते, ही मुंबई पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

इतर बातम्या : 

Raj Thackeray : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ म्हणणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीला जामीन, भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट राज ठाकरेंना इशारा!

Sanjay Raut Rokhthok : किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, भाजपला इशारा, तर मनसेवर घणाघात; संजय राऊतांचे 5 रोखठोक मुद्दे