AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच, सुप्रिया सुळेंचा बावनकुळेंवर जोरदार निशाणा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

...तर भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच, सुप्रिया सुळेंचा बावनकुळेंवर जोरदार निशाणा
| Updated on: Sep 30, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बारामती हवीशी वाटत असेल तर भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एवढचं नव्हे तर तुम्ही माझ्या सोबत चला मी तुम्हाला मतदारसंघातील प्रत्येक तालुका दाखवते, तसेच निवडणुकीत किती खर्च झाला याची देखील ऑनलाईन माहिती उपलब्ध आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी बावनकुळेंना आव्हान दिले आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुळे?

सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकणार त्यामध्ये सर्वात पहिला बारामती मतदारसंघ असेल असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. बावनकुळे यांच्या या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बारामती हवीशी वाटत असेल तर भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या सोबत चला मी तुम्हाला मतदारसंघातील प्रत्येक तालुका दाखवते, तसेच निवडणुकीत किती खर्च झाला याची देखील ऑनलाईन माहिती उपलब्ध आहे. प्रत्येकाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो, पण तो प्रत्येकाला मिळत नाही. जर भाजपाला बारामती हवी असेल तर याचा अर्थ आम्ही पास झालो असा होतो, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

बावनकुळेंचा दावा काय?

बावनकुळे यांनी असा दावा केला आहे की, आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 45 जागा जिंकू, त्यामध्ये बारामती पहिल्या स्थानावर असेल. एवढचं नव्हे तर पुढे बावनकुळे यांनी असंही म्हटलं आहे की,  बारामतीचा विषय निघाल्यानंतर आता सुप्रिया सुळे रोज 25 गावांना भेटी देत आहेत. बावनकुळेंच्या टीकेचा सुप्रिया सुळे यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार