दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश : सुप्रिया सुळे

दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश : सुप्रिया सुळे

ग्रंथालयं हे शांततेचं ठिकाण आहे. मात्र दिल्लीत ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला. दिल्लीत झालेला हिंसाचार हा देशाच्या गृह मंत्रालयाचं मोठं अपयश आहे.

Nupur Chilkulwar

|

Dec 17, 2019 | 5:15 PM

बारामती : दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याचा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भाजपला लगावला (Supriya Sule on Jamia). देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. भाजपच्या कार्यकाळातील पाच वर्षातील गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्याने विरोधक अधिवेशनात गोंधळ घालत आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला (Supriya Sule on BJP).

बारामती येथील रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (17 डिसेंबर) पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ग्रंथालयं हे शांततेचं ठिकाण आहे. मात्र दिल्लीत ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला. दिल्लीत झालेला हिंसाचार हा देशाच्या गृह मंत्रालयाचं मोठं अपयश असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. आपण प्रथमच देशात एवढा अत्याचार पाहिला असून देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची आणि मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे, देशासमोर अनेक प्रश्न उभे असताना त्यांच्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे, राज्यातल्या सध्याचे विरोधक मागील पाच वर्षात केलेल्या गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्याने अधिवेशनात गोंधळ घालत असल्याचा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

देशापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना केंद्रातले सत्ताधारी आणि राज्यातले विरोधक नको त्या विषयांना महत्त्व देऊन जनतेचं अन्यत्र लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. राज्यातल्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आहे. त्यामध्ये चांगली चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, विरोधकांकडून कोणतीही चर्चा न करता गोंधळ घातला जात आहे. मागील पाच वर्षात त्यांनी केलेल्या गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्यामुळे त्यांच्याकडून गोंधळ घातला जातो आहे काय? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या :

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ

नागरिकत्व कायद्याला विरोध, अलिगढ विद्यापीठात चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात

‘जामिया मिलिया’च्या आंदोलक विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक, अक्षय कुमार म्हणतो…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें