नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ

दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी 3 बस आणि काही मोटारसायकलींची जाळपोळ (Delhi Protest against citizenship act) केली.

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं (Delhi Protest against citizenship act) आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी 3 बस आणि काही मोटारसायकलींची जाळपोळ (Delhi Protest against citizenship act) केली. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी (Delhi Protest against citizenship act) झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (15 डिसेंबर) दिल्लीतील जामियानगरपासून ओखला या परिसरापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात जामिया मिलिया इस्लामिया युनिवर्सिटीचे काही विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याचे बोललं जात आहे. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर पोलिसांनी याला प्रत्युत्तर करताना अश्रूधारांच्या नळकांड्या फेकल्या आणि लाठीचार्ज केला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर आणि अग्निशमन दलावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच काही बसेसच्या खिडक्याही तोडण्यात आल्या. त्याशिवाय काही ठिकाणी हातात तिंरगा घेऊन नवीन नागरिकता कायद्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी रहदारी ठप्प झाली (Delhi Protest against citizenship act) आहे.

“नागरिकत्व कायद्याविरोधात आम्ही शांतपणे आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत आंदोलकांनी विरोध केला असता पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने काही आंदोलनकर्त्यांनी बसेसला आग लावली आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.” असे काही आंदोलनकर्त्यांचे म्हणणं आहे.

दरम्यान नक्की ही जाळपोळ कोणी केली? यामागे काही राजकारण आहे का? याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका काय? एकनाथ शिंदे म्हणतात..

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

CAB Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *