AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“धनगर समाजाला फडणवीसांकडून आश्वासनांची गाजरं”

नवी दिल्ली : धनगर समाजाला अनुसूचित जमाजीतचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्या सभांमध्ये छातीठोकपणे आश्वासनं दिली. मात्र, ही केवळ आश्वासनंच राहिल्याचे समोर आले आहे. कारण या आश्वासनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतेही ठोस पावलं उचलल्याचे दिसून येत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याचे […]

धनगर समाजाला फडणवीसांकडून आश्वासनांची गाजरं
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

नवी दिल्ली : धनगर समाजाला अनुसूचित जमाजीतचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्या सभांमध्ये छातीठोकपणे आश्वासनं दिली. मात्र, ही केवळ आश्वासनंच राहिल्याचे समोर आले आहे. कारण या आश्वासनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतेही ठोस पावलं उचलल्याचे दिसून येत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच लेखी उत्तरामध्ये काल लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली.

केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार, “धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने प्रस्तावच पाठवलेला नाही. जोपर्यंत असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाला हा दर्जा देता येणार नाही.”

विशेष म्हणजे, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यानंतर रजिस्टर जनरल ऑफ इंडिया आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाने त्याबाबतची शिफारस सरकारकडे पाठवणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्याशिवाय धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करणे अशक्य असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

“धनगर समाजाला फडणवीसांकडून आश्वासनांची गाजरं”

महाराष्ट्रात धनगर समाजाची मते मिळवण्यासाठीच मुख्यमंत्री आणि त्यांच्या भाजप पक्षाने या समाजासमोर आश्वासनांची गाजरे ठेवल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षात असताना बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. आज महाराष्ट्रात त्यांचे सरकार येऊन चार वर्षे झाली. केंद्रातही त्यांचेच सरकार आहे. संसदेचं हे अखेरचं अधिवेशन आहे. आतापर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावच पाठवलेला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आणि धनगर समाजाच्या वतीने मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते, की त्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, आणि या समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक