औरंगाबाद: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ आहे. पण ते चकवा आहेत. तर संदीपान भुमरे हे आमचे कामचुकार भाऊ आहेत, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. औरंगाबाद येथील सभेला संबोधित करताना त्यांनी या दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलं.