नौटंकीबाज जाणता राजा, संघाच्या मुखपत्रातून पवारांवर टीकास्त्र

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्राने संपादकीय लेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘नौटंकीबाज जाणता राजा’, ‘नाटकबाज राजा’, ‘खुमखुमी’, ‘दातखिळी बसलेली’, ‘कुख्यात’ अशा शब्दांचा वापर करत संघाच्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्राने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे धूर्त, संधीसाधू […]

नौटंकीबाज जाणता राजा, संघाच्या मुखपत्रातून पवारांवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्राने संपादकीय लेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘नौटंकीबाज जाणता राजा’, ‘नाटकबाज राजा’, ‘खुमखुमी’, ‘दातखिळी बसलेली’, ‘कुख्यात’ अशा शब्दांचा वापर करत संघाच्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्राने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे धूर्त, संधीसाधू आणि स्वार्थी राजकारणी असल्याचा आरोपही संघाच्या या मुखपत्राने केला आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला होता, त्या वक्तव्याच्या संदर्भाने संघाच्या मुखपत्रातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

संघाच्या मुखपत्रात नेमके काय म्हटले आहे?

“या मराठमोळ्या मातीत, स्वत:च्या घाणेरड्या अन् धूर्त राजकारणासाठी कुख्यात असलेल्या कथित जाणात्या राजाच्या राजकारणाचा रंग उतरत्या वयातही चढत्या आलेखाचा निदर्शक ठरु पाहतोज जणू!” अशी संपदाकीय लेखाची सुरुवात करुन ‘तरुण भारत’ने पुढे शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.

शरद पवारांनी काँग्रेसची स्तुती केल्याने ‘तरुण भारत’ने संपादकीय लेखात म्हटलंय की, “एवढा चांगाल पक्ष (काँग्रेस) दस्तुरखुद्द साहेबांनी का सोडला? 1977 मध्येही अन् 1999 मध्येही? का म्हणून सोनिया गांधींवर विदेशी असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता? का म्हणून त्यांनी काँग्रेससारख्या इतक्या भल्या राजकीय पक्षाशी फारकत घेऊन स्वत:ची वेगळी चूल मांडली होती? सामान्य माणसाला भेडसावणारे हे प्रश्न आहेत.” तसेच, “शरद पवारांच्या राजकारणाचा वारु कायम स्वार्थावर आरुढ राहिलेला. वयाच्या आठव्या दशकापर्यंतच्या प्रवासात एवढेच इप्सित गाठता आले आहे त्यांना. हीच प्रतिमा साकारता आली त्यांना उभ्या हयातीत. जनमानसातील स्वत:बद्दलच्या ठाम अविश्वासाची. जे बोलतात ते करीत नसल्याची अन् जे करतील ते हमखास गुपित राखण्याची.” असेही या संपादकीय लेखात म्हटले आहे.

मराठा आरक्षणावरुन निशाणा

“आधीच पेटलेले राज्यातले वातावरण आरक्षणाच्या घोषणेनंतर जरासे शांत व्हायला आलेले दिसत असताना ती धग कायम राहील, वातावरण कुठल्याही स्थितीत शांत होणार नाही, याची तजवीज करतो, आरक्षण बहाल केल्याचे श्रेय सरकारच्या पदरी पडू नये यासाठी समाजात संभर्म निर्माण करतो…व्वा रे! व्वा! हा म्हणे ‘जाणता राजा! नौटंकीबाज!”, अशी घणाघाती टीका शरद पवार यांच्यावर तरुण भारतमधून करण्यात आली आहे.

काल शिवसेना, आज शरद पवार टार्गेट

दरम्यान, कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका ‘तरुण भारत’मधून करण्यात आली आहे. एकंदरीत, 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षाच्या मदतीला धावून येत असल्याचेच दिसत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....