AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : …तर मग, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा आणीबाणी लावली असती, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut : "बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थतता समजून शकतो. म्हणून संसेदत उभं राहून विरोधी पक्ष नेत्याला अशा प्रकारे अपमानित करणं यात तुमची संस्कृती दिसते. तु्म्ही संविधान मानायला तयार नाही, म्हणून आम्ही संविधान खतरे में है असं म्हणत आहोत" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : ...तर मग, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा आणीबाणी लावली असती, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
संजय राऊत Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 03, 2024 | 10:21 AM
Share

“नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावलय. 400 पार बोलत होते, ते जेमतेम 200 पार झालेत. त्याला जबाबदार राहुल गांधी आहेत. तेच राहुल गांधी त्यांच्यासमोर लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावं. त्यांच्या हुकूमशाही, एकाधिकारशाही यावर राहुल गांधींचा लगाम येणार आहे” असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “विरोधी पक्ष नेता, ज्याला घटनात्मक, संविधानिक दर्जा आहे, त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील, तो त्यांचा अपमान नसून संविधानिक पदाचा अपमान आहे. म्हणून आम्ही संविधान खतरे में आहे असं म्हणत आहोत” असं संजय राऊत म्हणाले.

“मोदी कोणत्याही प्रकारच संविधान, घटना पाळायला तयार नाहीत. या बाल बुद्धीच्या नेत्याने तुम्हाला लोकसभा निवडणुकीत घाम फोडला. या बालबुद्धीच्या नेत्यांमुळे तुम्हाला बहुमत गमवाव लागलं. या बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थतता समजून शकतो. म्हणून संसेदत उभं राहून विरोधी पक्ष नेत्याला अशा प्रकारे अपमानित करणं यात तुमची संस्कृती दिसते. तु्म्ही संविधान मानायला तयार नाही, म्हणून आम्ही संविधान खतरे में है असं म्हणत आहोत” असं संजय राऊत म्हणाले.

‘तुम्ही 50 वर्षापूर्वीची आणीबाणी विसरली पाहिजे’

राज्यसभेत काल आपला माईक बंद करण्यात आला, असा दावा संजय राऊत यांनी केला. “भाजपाने कशा प्रकारे निवडणूक लढवली, लोकसभेच्या काही जागा कशा चोरल्या हे सांगत असताना माझा माईक बंद केला” असं संजय राऊत म्हणाले. “मला खर बोलायच होतं, हे आपातकाल, आणीबाणी विषयी सतत बोलत असतात, ते सत्य मला सांगायच होतं. हे त्यांना समजल्यामुळे त्यांनी माझा माईक बंद केला” असं संजय राऊत म्हणाले. “तुम्ही 50 वर्षापूर्वीची आणीबाणी विसरुन भविष्यकाळाकडे पाहिलं पाहिजे. भूतकाळाचे मुद्दे उकरुन काढू नये. 25 जून 1975 रोजी रामलीला मैदानावरुन सैन्याने बंड करावं, लष्कराने बंड करावं असं आव्हान करण्यात आलं. त्यानंतर देशात अराजक माजेल अशी भिती इंदिरा गांधी यांनी वाटू लागली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत, अशा प्रकारे तेव्हाचे नेते जाहीरपणे बोलायला लागेल. त्यावेळी इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी असते तर त्यांनी सुद्धा आणीबाणी लावली असती” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.