Worli Hit & Run Case : ‘रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या…’, खासदाराचा संतप्त सवाल

Worli Hit & Run Case : "आरोपीला त्याच्या कुटुंबाला कठोर शिक्षा होत नाही, तो पर्यंत त्या 10 लाखाला किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की, मुख्यमंत्री पैसा वाटत फिरतात. त्या खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहेत का?"

Worli Hit & Run Case : 'रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या...', खासदाराचा संतप्त सवाल
worli hit and run case
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:02 AM

वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 लाख रुपयाची मदत जाहीर केलीय. त्यावर संजय राऊत यांना मीडियाने प्रश्न विचारला. “आरोपीला त्याच्या कुटुंबाला कठोर शिक्षा होत नाही, तो पर्यंत त्या 10 लाखाला किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की, मुख्यमंत्री पैसा वाटत फिरतात. त्या खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहेत का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.”या राज्यात कायदा-सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालीय. रस्त्यावर चिरडून मरतेय. राज्याचा गृहमंत्री युजलेस आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधी संवेदना नाही. असा गृहमंत्री राज्याला मिळणं दुर्देव आहे. गृहमंत्री आपलं कर्तव्य पार पाडतायत की नाही. मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते. तिच्या किंकाळ्या, आक्रोश कानापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या पैशाची मस्ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘कोणाचा फायदा, कोणाला होणार हे बोलण्याची ही जागा नाही’

उद्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. यात 9 महायुतीचे आणि 3 मविआचे उमेदवार रिंगणात आहेत. आज संजय राऊत मीडियाशी बोलताना म्हणाले की, “कोणाचा फायदा, कोणाला होणार हे बोलण्याची ही जागा नाही. शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार आहेत, ते आज पोहोचतील” “शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिलंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञात सातव हे तिन्ही मविआचे उमेदवार आहेत. जी रणनिती आम्ही बनवलीय, त्यानुसार तिन्ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील. महायुतीने आपले आमदार संभाळावेत” असं संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.