Ajit Pawar : अजित पवार माझ्यासाठी…; गुणरत्न सदावर्ते यांचं मोठं विधान

Gunratna Sadavarte on Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचं मत काय आहे? अजित पवार यांना सदावर्ते यांचा पाठिंबा आहे की विरोध?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सदावर्ते यांची सविस्तर प्रतिक्रिया...

Ajit Pawar : अजित पवार माझ्यासाठी...; गुणरत्न सदावर्ते यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 9:50 AM

आनंद पांडे, प्रतिनिधी, मुंबई| 08 ऑक्टोबर 2023 : जरी अजित पवार उपमुख्यमंत्री  असले तरी त्यांच्यावर मी विश्वास ठेवत नाही. अजित पवार यांचे तैलचित्र आम्ही कुठेही लावणार नाही. प्रभू रामचंद्र रामाची विचारधारा आणि अशा अनेक महापुरुषांची विचारधारा आहे. अनेक नेते मंडळाची विचारधारा आहे. आमची विचारधारा अजित पवार यांच्यासोबत नाही आहे. अजित पवार यांना आमचा व्यक्तिगत विरोध आहे. युती सरकारला आमचा विरोध नाही. अजित पवार माझ्यासाठी नथिंग आहेत. अजित पवार माझ्यासाठी नथिंगच आहेत…, असं म्हणत एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची अजित पवार यांचा कडाडून विरोध केला.

शरद पवार यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना पोटसूळ उठला आहे. अखंड भारताचे विधाते नथुराम गोडसे आहेत. नथुराम गोडसे यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत. पोस्टरवर अजित पवार यांचा फोटो दिसून येत नाही. पवार कुटुंबियांच्या लोकांवर कायम ना पसंती आहे, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एसटी महामंडळाचे प्रमुख पदाधिकारीही तेव्हा त्यांच्या सोबत होते. विविध मागणीसाठी त्यांनी ही भेट घेतली. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

एसटी संदर्भात अनेक वर्षांपासूनच्या भत्त्याचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडला. महाराष्ट्राच्या प्रमुख प्रश्नांवर आणि एसटी महामंडळ संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्या सोबतच आणि कंत्राटीचे विषय संदर्भात युवकांची नाराजी देखील आहे. त्यासोबत इतर विषय देखील आहेत. यासोबतच एसटी महामंडळातील 42 टक्के जो महागाई भत्ता दिला आहे. त्यासोबतच 2016 पासून ते 2017 देण्यात आलेला नाही. याबाबत पुन्हा नवीन जीआर निघावा, असं गुणरत्न सदावर्ते यावेळी म्हणाले.

शंभर-दोनशे पेक्षा अधिक लोकांना नोकरीतून काढण्यात आलेलं आहे. त्यांनाही पुण्यात नोकरीत रजू करण्याची मागणी देखील केली आहे. एसटीमधल्या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळावा आणि त्यात वाढ व्हावी. त्यासाठी देखील मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे. एसटी महामंडळामध्ये इतर संचालकाची भरती व्हावी. त्यासाठी अनेक अशी मागणी देखील करण्यात आली. बँकेसंदर्भात जे कोण अधिकारी असेल यावर तात्काळ कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे, असं सदावर्ते यांनी यावेळी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.