AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : बादशहा मुर्गे लडाता है, सामानातून केंद्र सरकार व पंतप्रधानांना खडे बोल सुनावले

राष्ट्रीय ऐक्य आणि अखिल भारतीयत्व हे शब्द आता निकाली काढण्यात आले आहेत. रामनवमी, हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे हे अन्न, वस्त्र, निवारा व रोजगार या विषयापेक्षा महत्वाचे ठरले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात हिंदू -मुसलमान असे दंगलीचे वातावरण तयार केले जात असतांना पाटण्यातील एका बातमीने मी अस्वस्थ झालो आहे.

Saamana : बादशहा मुर्गे लडाता है, सामानातून केंद्र सरकार व पंतप्रधानांना खडे बोल सुनावले
सामानातून केंद्र सरकार व पंतप्रधानांना खडे बोल सुनावले Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2022 | 8:10 AM
Share

मुंबई – गरिबी उपासमारीच्या बाबतीत हिंदुस्थानने पाकिस्तानला मागे टाकले आहे. नोकऱ्या नाहीत म्हणून पदवीधर चहाच्या टपऱ्यांवर काम करीत आहेत. महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) हे मुख्य प्रश्न आहेत, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी बादशहा कोंबड्यांना झुंजवत आहेत ! अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरती करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदु-मु्स्लिम दंगल व्हावी असं वातावरण तयार केलं जात आहे. तसेच रामनवमी, हनुमान चाळीसा आणि मशिंदीवरील भोंगे आता लोकांना अधिक महत्त्वाचे वाटायला लागले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा याकडे कसे दुर्लक्ष केले जात आहे हेही पाहावयास मिळत आहे असा सवाल देखील सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

पंतप्रधान देखील चहा विकायचे ते राजकारणात आले

राष्ट्रीय ऐक्य आणि अखिल भारतीयत्व हे शब्द आता निकाली काढण्यात आले आहेत. रामनवमी, हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे हे अन्न, वस्त्र, निवारा व रोजगार या विषयापेक्षा महत्वाचे ठरले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात हिंदू -मुसलमान असे दंगलीचे वातावरण तयार केले जात असतांना पाटण्यातील एका बातमीने मी अस्वस्थ झालो आहे. पाटण्यातील एका पदवीधर मुलीने ज्या कॉलेजला शिकली तेथेच तीला चहाची टपरी टाकावी लागली. दोन वर्ष नोकरीसाठी प्रयत्न करूनही तिला नोकरी मिळाली नाही. कधीकळी आपले पंतप्रधान देखील चहा विकायचे ते राजकारणात आले आणि नतर पंतप्रधान झाले व विश्वगुरू म्हणून प्रवचने झोडत आहेत.

बेरोजगारी व तरूणांच्या निराशेवर सध्या उपाय नाही

पण देशातील बेरोजगारी व तरूणांच्या निराशेवर सध्या उपाय नाही. उपाय एकचं ते म्हणजे धर्मांध व्हा. बेबंद व्हा. रामनवमी, हनुमान जंयतीच्या शोभायात्रात सहभागी होऊन बेधुंद व्हा ! देशात फक्त मशींदीवरील भोंगे हीचं मुख्य समस्या नाही. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न वेगळे आहेत अशी सामानातून केंद्र सरकार व पंतप्रधानांना खडे बोल सुनावले आहेत.

Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ

Mega Block : आज मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर रेल्वेवरच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या कशी असेल लोकलसेवा

Amravati firing : अमरावतीत शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर गोळीबार! अज्ञातांनी योगेश गरड यांच्यावर झाडल्या गोळ्या

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.