सत्तांतरानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, नाना पटोलेंनी सांगितला शिंदे सरकारच्या ‘त्या’ कमजोर बाजू..!

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईसाठी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

सत्तांतरानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, नाना पटोलेंनी सांगितला शिंदे सरकारच्या 'त्या' कमजोर बाजू..!
कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Image Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे

|

Oct 02, 2022 | 2:51 PM

विजय गायकवाड Tv9 प्रतिनिधी, मुंबई : शिंदे सरकारची स्थापना होऊन तीन महिने होत आहेत. गेल्या तीन महिन्यात केवळ घोषणा झाल्या असून विकासापासून राज्य (Maharashtra) वंचितच राहिलेले आहे. तर इतर पक्षांची घुसमट करण्यासाठी ईडीसारख्या (ED Office) केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्यामुळे सत्तांतरापासून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. ऐन सणासुदीमध्ये गोळीबार झाला तर याच सरकारमधील मंत्री हे मराठ्यांच्या अंगाला खाज सुटली का अशी वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे आपणच कसे मोठे हे दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

गेल्या तीन महिन्यामध्ये एखादे विकासाचे काम झाले असे नाही, तर गणपतीच्या काळात प्रभादेवी परिसरत गोळीबार करण्यात आला. एवढेच नाहीतर आरक्षणाच्या मागणीवरुन मराठ्यांच्या अंगाला खाज सुटली काय अशी वक्तव्य ही मंत्र्याच्या तोंडून शोभत नाहीत. राज्यात काय सुरु आहे हे जनता उघड्या डोळ्याने पाहत असल्याचे पटोले म्हणाले आहेत.

केवळ घोषणाबाजीने काही होत नाही तर जनतेचे प्रश्न सोडवणे तेवढेच महत्वाचे आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईसाठी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

भाजपाला आता दाखवायला काही नाही म्हणून वेगळ्याच विषयावर जनतेचे लक्ष केंद्रीत करायचे ही भाजपाची जुनी सवय आहे. विकासाचा मुद्दाच नसल्याने ईडीसारख्या संस्थांचा वापर करुन इतर पक्षातील नेत्यांवर कारवाईची टांगती तलावर ठेवायची हेच सुरु आहे.

राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे त्यांचाच नाकर्तेपणा आता जनतेसमोर येत आहे. जनताही हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत ज्या उद्देशाने सत्तांतर करण्यात आले तो उद्देश बाजूला ठेऊन स्वार्थ साधला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

सरकारमधील मंत्री, आमदार यांची बेताल वक्तव्य समोर येत आहेत. गणेशोत्सावात गोळीबार तर झालाच पण मंत्र्याच्या वक्तव्याचा हवाला देण्यासाठी पटोले यांनी तानाजी सावंत यांची क्लिपच दाखवली. त्यामध्ये महाराष्ट्र भिकारी होईल पण मी गरीब राहणार नाही असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें