Sanjay Raut: ज्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव संपवायचं आहे, त्यांना बाप जन्मात ते शक्य होणार नाही, संजय राऊत भाजपावर कडाडले, बंडखोरांना बाळासाहेबांचा आत्मा माफ करणार नाही

ज्या भाजपानं कालही आणि आजही शिवसेनेला खतम करण्याचा विडा उचललेला आहे. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. काल रात्री काळोखात बडोद्याला यांची मोठी मिटिंग झाली. देवेंद्र फडणवीस आणि दास यांच्यात. आणि एका मोठ्या राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा झाली. की महाराष्ट्रात शिवसेनेला खाली कसं खेचायचं. असे सांगत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

Sanjay Raut: ज्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव संपवायचं आहे, त्यांना बाप जन्मात ते शक्य होणार नाही, संजय राऊत भाजपावर कडाडले, बंडखोरांना बाळासाहेबांचा आत्मा माफ करणार नाही
शिवसेनेचे खासदार संजय राऊत
Image Credit source: TV 9 marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jun 25, 2022 | 10:33 PM

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आता आक्रमक झालेले आहेत. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray)आत्मा कधीही माफ करणार नाही, अशा तिखट शब्दांत त्यांनी बंडखोरांवर वार केला आहे. आमच्या अंगावर येऊ नका, फार महाग पडेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धवजींच्या सांगण्यावरुन आपण सगळ्यांना आवाहन करत होतो. आपण एकत्र काम केलंय, पण तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना मोडली, याची शेखी मिरवताय. बाळासाहेबांचा आत्मा तुम्हाला माफ करणार नाही. अशी टीका त्यांनी केली. आपण देव वगैरे मानत नाही, मात्र बाळासाहेबांना मानतो. तो एक दैवी पुरुष होता, चमत्कार होता. त्यांनी हजारो लाखो लोकांचं आयुष्य उभं केलं. त्यांनी महाराष्ट्र उभा केला,. हिंदुत्व उभं केलं. आणि तुम्ही त्यांचा देव, धर्म पळवता. अफजलखानाची औलाद आहेत हे. या शब्दांत संजय राऊत कडाडले आहेत.

फडणवीस -शिंदे भेटीवरही टीका

जे अफजलखान, औरंगजेबानं केलं तेच तुम्ही करताय, तेही भाजपाच्या मदतीने करता आहात. असा आरोप राऊतांनी केला. ज्या भाजपानं कालही आणि आजही शिवसेनेला खतम करण्याचा विडा उचललेला आहे. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. काल रात्री काळोखात बडोद्याला यांची मोठी मिटिंग झाली. देवेंद्र फडणवीस आणि दास यांच्यात. आणि एका मोठ्या राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा झाली. की महाराष्ट्रात शिवसेनेला खाली कसं खेचायचं. असे सांगत राऊतांनी टीकास्त्र सोडलं. हिंमत असेल तर काश्मिरात जे दररोज काश्मिरी पंडितांना मारतायेत त्यांना थांबवा, लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलंय, त्यांनी जमीन घेतलीय आपली तिकडे लक्ष द्या. अरुणाचलमध्ये तैवानच्या खाली चीनचे सैन्य आलेले आहे. तिथे लक्ष द्या. अशी टीका त्यांनी भाजपावर केली

बाळासाहेबांचं नाव संपवता येणार नाही

भाजपाला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खतम करायची आहे, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव संपवायचं आहे. पण ते त्यांना बापजन्मी शक्य होणार नाही. जोपर्यंत मुंबईत, महाराष्ट्रात शिवसैनिक जीवाची बाजी लावून लढायला तयार आहेत. तोपर्यंत दिल्लीतून कितीही अफजलखान, औरंगजेब येऊ द्या. त्यांचं थडगं या महाराष्ट्रात बांधलं जाईल, हा इतिहास सांगतो. असेही राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

लोकसभाही जिंकण्याचा विश्वास

महापालिका जिंकू, विधानसभा जिंकू आणि लोकसभा निवडणुकाही जिंकू, तयारीला लागा असे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिलेत. दाखवू शिवसेना कुणाच्या बापाची आहे. असे राऊत म्हणाले. एकच बाप आहे. तुमच्या दहा बापांना विचारुन या की लढण्याची ताकद आहे का. आम्ही आमच्या एका बापाला विचारु. आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. तुमच्या बंदुकीच्या गोळ्या ईडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही. आपलं घर जप्त केलंय. म्हणजे आवाज बंद झाला नाही, असे ते म्हणाले. जे गेले ते नामर्द, डरपोक आहेत. ते शिवसेनेसाठी गेले आणि महाराष्ट्रासाठी मेले, अशा कठोर शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें