विधानसभा निवडणुकीत सांगलीची छाप, तीन जावई थेट विधानसभेत

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Election Result) सध्या राज्यभरात सांगलीची चर्चा होत आहे. याला कारणही तसंच आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत सांगलीचे तीन जावई (Son in Law of Sangli become MLA) विधानसभेत पोहचले आहेत.

विधानसभा निवडणुकीत सांगलीची छाप, तीन जावई थेट विधानसभेत
6 आणि 7 मार्चला विधिमंडळातील 2,476 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते. यापैकी 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 5:58 PM

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Election Result) सध्या राज्यभरात सांगलीची चर्चा होत आहे. याला कारणही तसंच आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत सांगलीचे तीन जावई (Son in Law of Sangli become MLA) विधानसभेत पोहचले आहेत. यात राष्ट्रवादीचे नेत धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. या तिघांमधील सामाईक दुवा म्हणजे हे तिनही दिग्गज नेते सांगली जिल्ह्याचे जावई (Son in Law of Sangli win the Assembly Election) आहेत. त्यामुळे सांगलीत हा चर्चेचा विषय झाला असून या तिघांचंही कौतुक केलं जात आहे.

धनंजय मुंडे राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी परळी मतदारसंघातून माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. धनंजय मुंडे हे सांगलीचे जावई आहेत. सांगली जिल्ह्यातील बेडग ही त्यांची सासरवाडी. त्यामुळे परळीतील त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या सासरवाडीतील लोकांनाही त्यांच्या विजयाचा आनंद झाला. महादेव ओमासे असं धनंजय मुंडे यांच्या सासऱ्यांचं नाव आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सांगलीचे जावई आहेत. विशेष म्हणजे त्यांचीही सासरवाडी सांगली जिल्ह्यातील बेडग हीच आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि त्यांच्यात हा मोठा सामाईक दुवा आहे. बापूसाहेब घोरपडे (सरकार) असं पृथ्वीराज चव्हाण यांच्या सासऱ्यांचं नाव आहे. घोरपडे यांचा बेडगमध्ये मोठा वाडा देखील आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधून विजय मिळवल्यानंतर बेडगमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकट्या बेडगमधील दोन जावई दोन महत्त्वाच्या पक्षांचे मोठे नेते असल्यानं देखील बेडगकरांची छाती अभिमानाने फुलली आहे.

विधानसभेत पोहचलेला सांगलीचा तिसरा जावई म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे जावई आहेत. शहाजीदादा पाटील असं बाळासाहेब थोरात यांच्या सासऱ्यांचं नाव. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं. त्यामुळे तांबवे गावातही आनंदाचं वातावरण आहे. बाळासाहेब थोरात आमच्या गावचे जावई आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना तांबवे गावचे गावकरी व्यक्त करतात.

अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यातील 3 जावयांची मोठी चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.