AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू खासदाराला जीवे मारण्यासाठी ३ कोटींची सुपारी

नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला असून आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देणारी व्यक्ती ही परभणीतील असावा, अशी शक्यता वर्तविली होती. ही तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू खासदाराला जीवे मारण्यासाठी ३ कोटींची सुपारी
Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Mar 25, 2023 | 8:52 PM
Share

परभणी : उद्धव ठाकरे यांना सोडून ४० आमदार आणि १३ खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, उद्धव ठाकरे यांना खंबीर साथ देणारे काही मोजकेच खासदार आता त्यांच्यासोबत आहेत. यातीलच एका खासदाराला जीवे मारण्यासाठी तीन कोटींची सुपारी देण्यात आली आहे. याबाबत त्या खासदाराने पोलीस अधीक्षक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे याच खासदाराला जीवे मारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दोन कोटींची सुपारी देण्यात आली होती आणि आता पुन्हा ३ कोटींची सुपारी देण्यात आल्यामुळे या सुपारी मागील सूत्रधार कोण याची चर्चा सुरु झाली आहे.

परभणीचे खासदार खा. संजय जाधव हे गेल्या मागील वीस वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहेत. शिवसेना फुटली तरी संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. दोन वर्षापूर्वी आपल्याला जीवे मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी देण्यात आली आहे, अशी तक्रार खा. जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली होती.

नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला असून आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देणारी व्यक्ती ही परभणीतील असावा, अशी शक्यता त्यांनी त्यावेळी वर्तविली होती. जाधव यांनी ही तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका टीमने तपास चक्रे फिरवून नांदेड, पंजाब व इतर राज्यात अनेकांची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.

मात्र, खासदार संजय जाधव यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली असून आपल्याला जीवे मारण्यासाठी एका नवीन व्यक्तीला 3 कोटीची सुपारी देण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. खा. जाधव यांच्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने त्यांना सुरक्षारक्षक देवून तपास चालू केला आहे.

नवीन माणसाला सुपारी दिली

परभणी जिल्ह्यातून यापूर्वी मला जीवे मारण्याची सुपारी एका टोळीला दिली होती. आता एका नवीन टोळीला 3 कोटींची सुपारी देण्यात आली आहे. माझे कुणाशीही हाडवैर नाही. पण, सुपारी दिल्याची माझी माहिती पक्की खरी आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे असे खासदार संजय जाधव यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितले.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.