Tv9-C Voter Exit Poll : यूपीत सपा-बसपाची जोरदार मुसंडी, भाजपला भगदाड

Tv9-C Voter Exit Poll | केंद्रातील सत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसणार असून, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोठी मुसंडी मारणार आहे, असे चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमधून समोर आले आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 40, तर भाजप आणि मित्र पक्षांना 38 जागा मिळतील. तसेच, …

Tv9-C Voter Exit Poll : यूपीत सपा-बसपाची जोरदार मुसंडी, भाजपला भगदाड

Tv9-C Voter Exit Poll | केंद्रातील सत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसणार असून, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोठी मुसंडी मारणार आहे, असे चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमधून समोर आले आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 40, तर भाजप आणि मित्र पक्षांना 38 जागा मिळतील. तसेच, काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल, असे एकंदरीत चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. भाजपप्रणित एनडीएला 2014 साली 73 जागा मिळाल्या होत्या. त्यावरुन यंदा भाजपप्रणित एनडीए 73 वरुन थेट 38 वर येणार आहेत, असे एक्झिट पोलमध्ये दिसते आहे.

दुसरीकडे, 2014 साली समाजवादी पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या, तर बहुजन समाज पक्षाला शून्य जागा मिळाल्या होत्या. यंदा सपा आणि बसपाने युती केल्याने त्यांच्या जागा थेट 40 वर जाणार असल्याचे ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.

उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा?

  • भाजपप्रणित एनडीए – 38 (44.10 टक्के मतं)
  • सपा+बसप+रालोद – 40 (41.90 टक्के मतं)
  • काँग्रेसप्रणित यूपीए – 2 (11.40 टक्के मतं)

2014 सालीही काँग्रेसला उत्तर प्रदेशात अमेठी आणि रायबरेली अशा केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. यंदाही एक्झिट पोलनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशात दोनच जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एग्झिट पोलभाजप + काँग्रेस +इतर
टीव्ही 9-सी व्होटर 287128127
टाईम्स नाऊ –VMR306132104
एबीपी-नेल्सन 267127148
न्यूज 24 – टुडेज चाणक्य34070133
न्यूज नेशन282-290111-126130-138
न्यूज 18- IPSOS 33682124
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 287128127
न्यूज एक्स242164136
रिपब्लिक – जन की बात 30512487

संबंधित बातम्या :

Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *