AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने ममतांची टीएमसी फोडली, सात खासदार भाजपच्या वाटेवर

कोलकाता : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीअगोदर फोडाफोडीचं राजकारणही सुरु झालंय. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. तृणमूल काँग्रेसचा मोठा नेता आणि विद्यमान खासदाराने भाजपात प्रवेश केलाय. शिवाय आणखी पाच खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. भाजपला धारेवर धरणाऱ्या ममतांसाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण, एका खासदाराला पक्षातून काढून टाकण्यात […]

भाजपने ममतांची टीएमसी फोडली, सात खासदार भाजपच्या वाटेवर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

कोलकाता : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीअगोदर फोडाफोडीचं राजकारणही सुरु झालंय. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. तृणमूल काँग्रेसचा मोठा नेता आणि विद्यमान खासदाराने भाजपात प्रवेश केलाय. शिवाय आणखी पाच खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय.

भाजपला धारेवर धरणाऱ्या ममतांसाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण, एका खासदाराला पक्षातून काढून टाकण्यात आलंय. तर दुसऱ्या खासदाराने भाजपचा झेंडा हातात घेतलाय. भाजपात प्रवेश केल्यानंतर खासदार सौमित्र खान यांनी पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही जिवंत नाही, तिथे फक्त पोलीस राज्य आहे, असं ते म्हणाले.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुकूल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी सौमित्र खान यांना भाजपचं सदस्यत्व दिलं. मुकूल रॉय हे देखील टीएमसीतून भाजपात आले आहेत. रॉय यांनी दावा केला की, आणखी पाच खासदार आमच्या संपर्कात आहेत. नावं जाहीर केली नसली तरी हे पाच खासदार लवकरच भाजपात येणार असल्याचं बोललं जातंय.

काही दिवसांपूर्वीच भाजपात आलेले मुकूल रॉय, सौमित्र खान आणि आणखी संपर्कात असलेले पाच खासदार मिळून हा आकडा मोठा होतोय. शिवाय यापैकी अनेक महत्त्वाचे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्य सरकारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ममतांची सत्ता आहे.

सौमित्र खान यांनी पक्ष सोडल्यानंतर काही वेळातच दुसरे खासदार अनुपम हाजरा यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची हालचाल सुरु करण्यात आली होती.

सौमित्र खान यांच्यामुळे भाजप आणखी मजबूत होणार असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ताकद पणाला लावली आहे. यासाठी अनेक दिग्गजांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी भाजपात प्रवेश केलाय.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम बंगाल अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. कारण, उत्तर प्रदेश (80) आणि महाराष्ट्र (48) या राज्यांनंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणारं पश्चिम बंगाल हे तिसरं राज्य आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागा आहेत. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट पश्चिम बंगालमध्ये नव्हती. इथे टीएमसीने 34, काँग्रेसने चार, सीपीएम आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...