AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant : उदय सामंतांची गाडी फोडली, तानाजी सावंतांच्या घराकडे जाताना शिवसैनिकांकडून हल्ला

सभा संपल्यानंतर कात्रज चौकात अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवलेला आहे. तर यावेळी गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.

Uday Samant : उदय सामंतांची गाडी फोडली, तानाजी सावंतांच्या घराकडे जाताना शिवसैनिकांकडून हल्ला
उदय सामंतांची गाडी फोडलीImage Credit source: tv9
| Updated on: Aug 02, 2022 | 11:35 PM
Share

पुणे : बंडखोर आमदार (Shivsena MLA) आणि आक्रमक शिवसैनिक यांच्यातला संघर्ष हा सध्या शिगेला पोहोचताना दिसत आहे. कारण आज पुण्यात आक्रमक शिवसैनिकांनी एक धक्कादायक प्रकार केलाय.  एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी आक्रमक हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची (Uday Samant) गाडी ही शिवसैनिकांकडून फोडण्यात आलेली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना हा प्रकार घडलेला आहे. सभा संपल्यानंतर कात्रज चौकात अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवलेला आहे. तर यावेळी गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रकरणा आता जोरादार तापण्याची शक्यता आहे. तर दुसरीकेड कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान हे आता पोलिसांसमोर असणार आहे.

पाहा गाडी फोडल्याचा हा व्हिडिओ

हा पहिलाच हल्ला नाही

बंडखोरा आमदारांविरोधात हा उद्रेक फक्त आत्ताच पहायाला नाही मिळाला तर हे आमदार गुहाटीत असतानाही अनेकांचे कार्यालयं शिवसैनिकाकडून फोडण्यात आली होती. तर कित्येक आमदारांच्या पोस्टरलाही काळ फासण्यात आलं होतं. राज्यभर बंडखोर आमदारांविरोधात गद्दार म्हणत आंदोलनं पुकारण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी पुतळे ही जाळण्यात आले होते. तो शिवसैनिकांमधला उद्रेक अजूनही शांत झालेला नाहीये तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे सध्या पुण्या दौऱ्यावरच आहेत आणि त्याचवेळी या गाडीवर झालेला हल्ला आता पुन्हा चर्चेत आला आहे. तर या शिवसैनिकांविरोधात एकनाथ शिंदे हे पोलिसांनी कठोर आदेश देण्याची दाट शक्यता आहे. पोलीस प्रशासन या शिवसैनिकांचीही धरपकड करण्याचीही दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. हा वाद आता थांबण्याचं नाव घेत नाहीये.

हल्ल्यानंतर गाडीची अवस्था

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या त्या भाषणाची आठवण?

तर दुसरीकडे वादग्रस्त विधान करणे हिंगोलीचे नवे संपर्कप्रमुख बबन थोरात यांना महागात पडले आहे. त्यांच्या विरोधामध्ये हिंगोली शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरांमध्ये ठाकरे गटातील शिवसैनिकांचा निष्ठा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्या दरम्यान बोलताना गद्दाराच्या  गाड्या फोडणाऱ्यांचा  मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येईल असे आव्हान केले होते. त्यामुळे शांतता भंग  करत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या विरोधामध्ये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.