AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आता एकच अजेंडा…” काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, पृथ्वीबाबा-विलासकाका एकत्र

पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकर हे राजकीय विरोधक पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले.

आता एकच अजेंडा... काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, पृथ्वीबाबा-विलासकाका एकत्र
| Updated on: Nov 06, 2020 | 4:25 PM
Share

कराड : “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysingh Patil Undalkar) यांनी दिली. माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड तालुक्यात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. काँग्रेसमधील दिग्गज नेते – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि विलासकाका पाटील उंडाळकर हे कट्टर विरोधक यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. (Udaysingh Patil Undalkar joins Karad Congress in presence of Prithviraj Chavan at Satara)

पृथ्वीबाबा आणि विलासकाका या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरु होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटकाही बसला होता. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकर हे राजकीय विरोधक पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीरपणे सक्रिय होत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसमध्ये सक्रीय होण्याचा निर्धार केला.

“ज्या विचारांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिलं, काही असामाजिक तत्त्व, समाजाला त्या विचारांपसानू दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संघर्ष असाच पुढे चालू राहिला असता तर त्यांना थोपवणं अडचणीचं झालं असतं आणि समाजाची हानी भरुन आली नसती. म्हणून संघर्ष मिटवून, मतांतरं संपवून, विचारांना प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा एकच अजेंडा आहे, काँग्रेसची विचारसरणी समाजात रुजवणे आणि समाजाचा विकासात्मक उत्कर्ष करणे” अशी प्रतिक्रिया उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

कट्टर विरोधक एकत्र, पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई, सातारा काँग्रेसची ताकद वाढणार

चव्हाण-उंडाळकरांची दिलजमाई!, उदयसिंह उंडाळकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

(Udaysingh Patil Undalkar joins Karad Congress in presence of Prithviraj Chavan at Satara)

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.